शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

शेतात वापरण्यात येणा-या रासायनिक पदार्थांचा त्वचेवर परिणाम, कंटाळून शेतक-याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 13:21 IST

रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.

बेनोडा शहीद (अमरावती) - रस्त्याशेजारी असणा-या झाडावर गळफास घेऊन शेतक-यानं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील लोणी-आलोडा येथील ही घटना आहे.  विजय मडावी (वय 55 वर्ष)असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्वचारोगाला कंटाळून त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते त्वचारोगने त्रस्त होते.  धक्कादायक बाब म्हणजे शेतात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांचा विजय मडावी यांच्या त्वचेवर परिणाम झाला असावा, अशी चर्चा संपूर्ण परिसरात आहे. यालाच कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचंही बोलले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार,  लोणी ते आलोडा रोडवरील प्रभाकर पाटील यांच्या शेताजवळ विजयचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विजयचे हात व पाय त्वचारोगामुळे सुजले होते. अनेक इलाज करुन ते थकले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेतात काम करताना त्यांना त्वचारोग उद्भवला. या आजारामुळे ते त्रासले होते. आजारापणालाच कंटाळून वडिलांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा जबाब त्यांचा मुलगा विपुल याने पोलिसांना दिला. पुढील तपास बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, पीएसआय भरत लसंते यांचे मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल राजू धुर्वे व त्यांचे पथक करत आहेत.

यवतमाळमध्ये फवारणीचे १८ बळी, ‘त्या’ शेतक-यांच्या मृत्यूची चौकशी

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा झाल्यामुळे तीन महिन्यांत १८ शेतक-यांचा बळी गेला, तर ५४६ शेतकरी अत्यवस्थ झाले आहेत. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने या प्रकरणाची अतिरिक्त मुख्य गृह सचिवांकडून चौकशी करण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. पीडित कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाखांची मदत सरकारने जाहीर केली. अशा दुर्घटना टाळण्यासाठी ‘सेफ्टी किट’ वितरित करण्याचे बंधन कीटकनाशक कंपन्यांवर घालण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. विमा योजनेसाठी अपात्र किंवा तांत्रिक कारणाने विमा कंपन्यांकडून मदत मिळू न शकणा-या शेतक-यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. फवारणीबाबत कृषी विभागातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येईल.विषबाधा प्रकरणात प्रशासनाकडून हलगर्जीपणा झाला आहे. फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे शेतक-यांना जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालणार आहे. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री

टॅग्स :Farmerशेतकरी