प्रभाव जागतिक योग दिनाचा; आम्हीही करतो योगासने ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:20 IST2019-06-21T13:19:54+5:302019-06-21T13:20:37+5:30
अमरावती शहरात पारधी समुदायातील मुलांनी जागतिक योग दिनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून या उपक्रमात आपलाही सहभाग नोंदविला.

छाया - मनीष तसरे
ठळक मुद्देवंचितांचाही जुळून आला योग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: अमरावती शहरात पारधी समुदायातील मुलांनी जागतिक योग दिनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून या उपक्रमात आपलाही सहभाग नोंदविला. नागरी सुविधांबाबत कायम वंचित असलेली ही मुले राजकमल चौकात अवतार मेहेरबाबा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने आयोजित उघड्यावरील शाळेत अक्षरे गिरवतात. या संस्थेच्या माध्यमातून काही सेवाभावी व्यक्तींनी त्यांना साक्षर करण्यासाठी आपला सहयोग विनामूल्य दिला आहे. योगदिनाच्या पार्श्वभूमीवर या वंचितांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य त्यांच्या जगण्याच्या वेदना लपवून गेले.