शिक्षा हवीच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:04 IST2017-05-16T00:04:22+5:302017-05-16T00:04:22+5:30
हे बोलके छायाचित्र आहे अमरावती शहर पोलीस दलाच्या वाहतूक व्यवस्थेचे.

शिक्षा हवीच...
शिक्षा हवीच... हे बोलके छायाचित्र आहे अमरावती शहर पोलीस दलाच्या वाहतूक व्यवस्थेचे. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून गर्ल्स हायस्कूल चौकाच्या दिशेने वाहतूक पोलीस शासकीय दुचाकीने असे सर्वांदेखत "राँग साईड" गेले. छायाचित्रात सर्वच वाहनचालक वाहतूक नियम पाळताना दिसत आहेत, नियमभंग करताहेत ते केवळ गणवेशधारी वाहतूक शिपाई आणि अधिकारी. सीपींनी या दोघांना पाठीशी घातले तर सामान्यांवर कारवाईचे त्यांना काय नैतिक अधिकार उरतात ?