शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सादील अनुदानावर शिक्षण समिती घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अमरावती : मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील खर्च भागविण्यासाठी शासनाकडून मिळणारा साहीलचा निधी शिक्षण विभागाकडून ...

अमरावती : मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमधील खर्च भागविण्यासाठी शासनाकडून मिळणारा साहीलचा निधी शिक्षण विभागाकडून असेसमेंट अनुदान निर्धारण न केल्याने शासनाकडे अडकला आहे. या अनुदानाची रक्कमही लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुुळे शिक्षण विषय समितीच्या सभेत या विषयावर चांगलेच घमासान झाले. ही गंभीर बाब लक्षात घेता झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी यासंदर्भात चौकशी समिती गठित करून महिनाभरात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश बुधवारी शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

झेडपी शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती प्रियंका दगळकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षांनी या समितीची बैठक घेतली.

जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी, खडू, फळा व इतर साहित्य, वीज आणि पाण्याची देयके, इमारतीचा, भाडेपट्टी, फर्निचरची दुरुस्ती यासाठी शासनातर्फे शाळांना सादील निधी दिला जातो. मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावरील व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून हा खर्च केला जातो; परंतु मागील दोन वर्षांपासून पैसे मिळाले. पण संबंधितांना तो खर्च भागवता आला नाही. परिणामी, अनेक शाळांवर लाखो रुपयांची थकबाकी आहे. यासाठी शिक्षक विद्यार्थी पालक व शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा निवेदने दिली; परंतु तरीही शिक्षण विभागाने त्याकडे लक्ष दिले नाही. सादील निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला वर्षाकाठी साधारण लाखो रुपयांचा निधी मिळतो.

परंतु मागील दोन वर्षांपासून शाळांचे असेसमेंट करून अहवाल सादर न केल्याने जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या अनुदानापासून वंचित आहे. परिणामी, जिल्ह्यातील शाळांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ६०० प्राथमिक, तर १४ माध्यमिक शाळा आहेत.

बॉक्स

अशी झाली अडचण

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शासनाने दिलेल्या ४२ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र (यूसी) व खर्चाचा ताळेबंद शिक्षण विभागाने शासनाला पाठवला नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पुढील खर्चाची मागणीही करता आली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बॉक्स

अध्यक्षांचे पत्रही बेदखल

साधा निधी रखडल्याचा मुद्दा दस्तुरखुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला होता. त्यासाठी त्यांनी मागील वर्षी सीईओंना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्राची दखल घेण्यात आली नसल्याचे शिक्षण समितीच्या बैठकीत समोर आले.