अचलपूर बाजार समितीत ई-नाम प्रकल्प धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST2021-05-30T04:10:55+5:302021-05-30T04:10:55+5:30

वायफाय, राउटर, लिज लाईन बंद. ३३ लाखांचा खर्च वाया, संगणकीय साहित्य खोलीबंद पान २ ची बॉटम फोटो पी २९ ...

E-name project in Achalpur Bazar Samiti | अचलपूर बाजार समितीत ई-नाम प्रकल्प धूळखात

अचलपूर बाजार समितीत ई-नाम प्रकल्प धूळखात

वायफाय, राउटर, लिज लाईन बंद.

३३ लाखांचा खर्च वाया, संगणकीय साहित्य खोलीबंद

पान २ ची बॉटम

फोटो पी २९ परतवाडा

परतवाडा : राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून पहिल्या फेजमध्ये दिल्या गेलेला ई-नाम प्रकल्प अचलपूर बाजार समितीत धूळखात आहे. हा प्रकल्प अचलपूर बाजार समितीत उभारण्याकरिता केंद्र सरकारचे ३३ लाख रुपये खर्ची पडले आहेत. यात ११ संगणक, ११ यूपीएस, ४ प्रिंटर, ५ वाय-फाय राऊटर, २ रेडिओ फ्रिक्वेन्सी मोडेम बाजार समितीला पुरविले गेले. संपूर्ण बाजार समिती परिसरासह यार्डवर ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी) बीएसएनएलची लीज लाईन टाकली गेली.

२०१७ -१८ मध्ये हा प्रकल्प उभारल्यानंतर ऑनलाइन कामकाज समजावून देण्याकरिता एक मंडी ॲनालिस्ट दिला गेला. तब्बल चार महिने त्याने ऑनलाइन कामकाज बाजार समितीतील प्रशासकीय यंत्रणेला समजावून सांगितले. दरम्यान, बाजार समितीतील दोन कर्मचाऱ्यांनी नागपूरला याबाबतचे आठ दिवसांचे स्वतंत्र प्रशिक्षणही घेतले.

या ११ संगणकांपैकी दोन संगणक बाजार समितीच्या ईन गेट आणि आऊट गेट वर ठेवल्या गेले. नेटवर्कचे स्विच बोर्ड दिले गेले. वायफाय नेटवर्कचे पाच राऊटर यार्डवर वेगवेगळ्या ठिकाणी बसविल्या गेले. यार्डमध्ये कंट्रोलिंग स्विच रॅक ठेवल्या गेली. रेडिओ फ्रिक्वेन्सीचे एक मोडेम अचलपूर बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या वर, तर दुसरे बीएसएनएलमध्ये लावले गेले. शेतकऱ्यांच्या शेतमालाची गुणवत्ता तपासण्याकरिता एक सुसज्ज प्रयोगशाळाही कार्यान्वित केली गेली.

बॉक्स

ऑप्टिकल फायबर खंडित

आज मात्र तो ऑप्टिकल फायबर केबल ठीकठिकाणी खंडित झाला आहे. बीएसएनएलची लिज लाईन बंद पडली आहे. स्विच बोर्डसह स्विच रॅकवर जाळे धरले आहे. यार्डवर राऊटर लटकले आहेत. इनगेट आणि आऊटगेटवर संगणक नाहीत. रेडिओ फ्रिक्वेन्सी मॉडेमची पिन काढण्यात आली आहे. वायफाय नेटवर्क बंद आहे. ई-नाम प्रकल्पांतर्गत बाजार समितीला पुरविल्या गेलेल्या संगणकांसह अन्य साहित्य एका खोलीत आहे. हा अख्खा प्रकल्पच बाजार समितीने गुंडाळून ठेवला असून या प्रकल्पावर खर्ची पडलेले केंद्र शासनाचे ३३ लाख पाण्यात गेले आहेत.

Web Title: E-name project in Achalpur Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.