महापालिकेत पाच उर्दू शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’
By Admin | Updated: January 25, 2015 23:06 IST2015-01-25T23:06:45+5:302015-01-25T23:06:45+5:30
नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याच्या दिशने पावले उचलली आहे. ओस पडणाच्या मार्गी

महापालिकेत पाच उर्दू शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’
अमरावती : नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाने शिक्षण क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याच्या दिशने पावले उचलली आहे. ओस पडणाच्या मार्गी असलेल्या शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु केली आहे. याच शृंखलेत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पाच उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये या प्रणालीचा शुुभारंभ केला जात आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी झाली होती. ‘शिक्षक जास्त तर विद्यार्थी कमी’ अशी अवस्था होती. मात्र आयुक्त अरुण डोंगरे यांनी पदाची सूत्रे हाती ठेतल्यानंतर विकास कामांना प्राधान्य देऊच मात्र, शिक्षणाच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आयुक्त डोंगरे यांनी शिक्षण विभागाचे शुद्धिकरण हाती घेतले. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देताना महापालिका शाळांमधील विद्यार्थी खासगी शाळांच्या स्पर्धेत कसा टिकेल, याचे नियोजन सुरु केले. मात्र महापालिका तिजोरीत ठणठणाट अशी विदारक स्थिती, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बोंबाबोंब, कंत्राटदारांची थकीत रक्कम अशा परिस्थितीत लोकसहभागातून ‘ई-लर्निंग’ सुरु करण्याचा निर्णघ घेतला. या उपक्रमासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या. पहिल्या टप्प्यात महापालिकेत पाच शाळांमध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. यात वडाळी, विलासनगर, बुधवारा, भाजीबाजार, खरकाडीपुरा येथील शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये हसतखेळत शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरु होताच ज्या विद्यार्थ्यांना अ,ब,क,ड येत नव्हते, ते विद्यार्थी आज इंग्रजी बोलू लागले आहे. एवढेच नव्हे तर गरीब, सामान्य कुटुंबातील विद्यार्थी संगणकावर बसून जगाची माहिती घेण्यात पुढे आला आहे. दोन वर्षांपूर्वीे महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी निमळविण्यासाठी शिक्षकांना दारोदार भटकावे लागत होते. मात्र ई-लर्निंग प्रणालीमुळे पालक आता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात आणून सोडत आहेत. नव्या अद्ययावत शिक्षण प्रणालीने हा बदल झाला असून महापालिकांच्या ६६ शाळांमध्यही ‘ई-लर्निंग’ प्रणाली सुरु करण्याचा आयुक्तांचा मानस आहे. पाच उर्दू शाळांमध्ये सुरु होणाऱ्या या प्रणालीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने करारनामा करण्यात आल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)