अमरावतीत लवकरच ई-बस ; चार्जिंग स्टेशनसाठी १० कोटींची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:07 IST2025-07-30T19:05:34+5:302025-07-30T19:07:06+5:30

Amravati : कोडेंश्वर मार्गालगतच्या महसूल जागेवर सुसज्ज इमारत साकारणार, पाच निविदा प्राप्त

E-buses soon in Amravati; Tender for charging station worth Rs 10 crore | अमरावतीत लवकरच ई-बस ; चार्जिंग स्टेशनसाठी १० कोटींची निविदा

E-buses soon in Amravati; Tender for charging station worth Rs 10 crore

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
मेट्रो शहराच्या धर्तीवर अमरावतीकरांनासुद्धा लवकरच पीएम ई-बस सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निधीतून कोंडेश्वर मार्गालगत सुसज्ज इमारतीसह चार्जिंग स्टेशन साकारले जाणार आहे. त्याअनुषंगाने इमारत बांधकामासाठी महानगरपालिका प्रशासनाने ई-निविदा प्रक्रिया राबविली असून, पाच निविदाधारक स्पर्धेत आहेत. अद्यापपर्यंत शहर अभियंत्यांनी निविदा उघडल्या नाहीत, अशी माहिती आहे.


केंद्र शासनाने अमरावती महानगरपालिकेला नऊ मीटर लांबीच्या ४० ई-बसेस मंजूर केलेल्या आहेत. सात मीटर लांबीच्या १० बसेसला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. बडनेरा लगतच्या कोंडेश्वर मार्गावरील ई-क्लास जमिनीवर १० कोटींच्या निधीतून ई-बससाठी सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे. येत्या काळात ६ कोटी ७३ लाखांच्या निधीतून चार्जिंग स्टेशन, वीज सबस्टेशन आदी बाबींचा समावेश असून, ही कामे एमएसईडीएल, महानगरपालिका प्रकाश विभागाच्या नियंत्रणात होणार आहे. ई-बसेससाठी राज्य शासनाने महसूलच्या जागेला मान्यता प्रदान केली आहे. 


जागतिक स्तरावर वाढते प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवर होणारा शासनाचा खर्च वाचविण्यासाठी 'ई-व्हेईकल' हा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यामुळे अमरावती शहरातील अंतर्गत दळणवळणासाठी ई-बस सेवेची प्रतीक्षा नागरिकांनाही लागली आहे.


आता नागपूरनंतर अमरावतीत ई-बस सेवा
केंद्र शासनाने 'मेट्रोपॉलिटिन' शहरात ई-बस सेवा अनिवार्य केली. नागपूर शहरात ती सुरू झाली आहे. आता अमरावतीत चार्जिंग केंद्राच्या जागेचा तिढा सुटला आहे. शासकीय जागेसंदर्भातील फाइल महसूल मंत्रालयाने मंजूर केली आहे. आता काही दिवसातच ई-बससाठी प्रत्यक्षात इमारत बांधकामाला प्रारंभ होणार असून, किमान या वर्षात तरी ई-बससेवा सुरू होईल, अशी अपेक्षा अमरावतीकरांना आहे.


"ई-बस सुविधेसाठी पाच निविदा प्राप्त झाल्या. इमारत बांधकाम व उर्वरित कामेसुद्धा आता वेगाने होतील. रस्ता सुरक्षा प्राधिकरणाने नव्याने ३५ मार्गांना मान्यता दिली."
- लक्ष्मण पावडे, उपअभियंता, वाहन कार्यशाळा, महानगरपालिका

Web Title: E-buses soon in Amravati; Tender for charging station worth Rs 10 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.