दर्यापूर बाजार समितीत सव्वा कोटींचा अपहार

By Admin | Updated: July 6, 2014 23:36 IST2014-07-06T23:36:11+5:302014-07-06T23:36:11+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टीएमसी (टेक्नालॉजी मिशन आॅफ कॉटन) अंतर्गत २ कोटी १० लाख ८ हजार रुपये किमतीच्या या प्रकल्पात एक कोटी २० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन विद्यमान

Dwarapur Bazar Committee disinvestment of Rs | दर्यापूर बाजार समितीत सव्वा कोटींचा अपहार

दर्यापूर बाजार समितीत सव्वा कोटींचा अपहार

दोन संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा : टीएमसी प्रोजेक्टमधील घोळ
दर्यापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टीएमसी (टेक्नालॉजी मिशन आॅफ कॉटन) अंतर्गत २ कोटी १० लाख ८ हजार रुपये किमतीच्या या प्रकल्पात एक कोटी २० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोन विद्यमान संचालकांसह पाच जणांविरुद्ध दर्यापूर पोलिसांनी फसवणूक व अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दर्यापूर बाजार समितीचे विद्यमान संचालक अरुण गावंडे, बळवंत वानखडे, प्रकल्प राबविणारी नागपूर येथील खरे व तारकुंडे कंपनी, या कंपनीचे स्थानिक स्थरावर काम पाहणारा अमरावती येथील ईश्वर वैद्य व आर्किटेक्ट अशा पाच जणांविरुध्द दर्यापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाजार समितीचे उपसभापती साहेबराव भदे यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्यापूर बाजार समितीमध्ये १ आॅगस्ट २००६ ते २००९ या कालावधीत कपास औद्योगिक प्रकल्प राबवायचा होता.

Web Title: Dwarapur Bazar Committee disinvestment of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.