शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

‘कोरोना’ काळात श्रमजिवी, कष्टकऱ्यांना मिळेल रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 5:00 AM

शासकीय विश्रामगृहात आमदार खोडके यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. कोरोना विषाणू संसगर्ग हे राष्ट्रीय संकट आहे. मात्र, संचारबंदीमुळे जिल्हा लॉकडाऊन होणार असून, सामान्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सामान्यांच्या चरितार्थाचा प्रश्न स्वस्त धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे सोडविण्याचे निर्देश आमदार खोडके यांनी दिले.

ठळक मुद्देसुलभा खोडके यांचा पुढाकार : स्वस्त धान्य वितरण प्रणालीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधी जमावबंदी, आता संचारबंदी लागू झाली. याचा सर्वाधिक फटका श्रमजिवी, कष्टकरी, गरिबांना बसणार आहे. त्यामुळे महानगरातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदारांच्या माध्यमातून धान्याचा पुरवठा करा, अशा सूचना आमदार सुलभा खोडके यांनी सोमवारी संंबंधित यंत्रणेला दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहात आमदार खोडके यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. कोरोना विषाणू संसगर्ग हे राष्ट्रीय संकट आहे. मात्र, संचारबंदीमुळे जिल्हा लॉकडाऊन होणार असून, सामान्यांना रोजगार नसल्याने त्यांच्यापुढे जगण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सामान्यांच्या चरितार्थाचा प्रश्न स्वस्त धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे सोडविण्याचे निर्देश आमदार खोडके यांनी दिले. महानगरात १६१ रेशन दुकानदार आहेत. एप्रिलमधील गहू, चनाडाळ, तूरडाळ, तांदळाचा कोटा २४ मार्चपासून वितरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात संचारबंदी असल्याने रेशन दुकानदारांना ओळखपत्र देण्याची संघटनेची मागणी मान्य केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून संचारबंदी काळात ते शिधापत्रिका धारकांना धान्यपुरवठा करतील, असा विश्वास आ. खोडके यांनी व्यक्त केला. यावेळी डीएसओ अनिल टाकसाळे, शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी नीता लबडे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भारत सरवैय्या, बाळासाहेब मिस सचिन अलेकर आदी उपस्थित होते.मे, जून महिन्यांचे अन्नधान्य वितरणावर निर्णयराज्य शासनाने मे, जूनचे स्वस्त धान्य वाटपाला मान्यता दिली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागणीनुसार मे, जूनचे चालान भरण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. ही उचल करताना दुकानदारांना टप्प्याटप्प्याने मुभा देण्याचे मान्य केले आहे. तसेच गोदाम भाड्याने घेण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य मिळावे, याबाबत आवश्यक सृूचना देण्यात आल्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या