बिजुधावडीदरम्यान दुचाकी परस्परांना भिडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:17+5:302021-07-07T04:15:17+5:30
एकाचा जागीच मृत्यू तीन गंभीर जखमी फोटो पी ०५ धारणी एक वाहनचालक ठार : धारणी : धारणी-अकोट मार्गावरील बिजुधावडी ...

बिजुधावडीदरम्यान दुचाकी परस्परांना भिडल्या
एकाचा जागीच मृत्यू तीन गंभीर जखमी
फोटो पी ०५ धारणी
एक वाहनचालक ठार :
धारणी : धारणी-अकोट मार्गावरील बिजुधावडी ते बारू गावादरम्यान दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यात बिजुधावडी गावातील एका इसमाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील व धडक देणारा दुचाकीस्वार व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू हिरालाल धांडे (३५, बिजुधावडी) असे मृताचे नाव आहे.
बिजुधावडी येथील राजू हिरालाल धांडे (३५) व त्याचे वडील हिरालाल डेबू धांडे (७८) हे दोघे सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यातून बोलावणे आल्याने धारणी येथे आले होते.ते काम आटोपून बिजुधावडीला परत जात असताना चिंचखेडा गावातील संतोष मांडीकर (३०) व त्याचा मित्र उत्तम मारोती अजनेरे (२८) हे दोघे त्यांच्या गावावरून अकोट-धारणी मार्गाने धारणीकडे भरधाव वेगाने येत होते. त्या दरम्यान राजू धांडे यांची एमएच २७ इ ९०६४ व संतोष मांडीकर याच्या एमएच २७ झेड १४३९ मध्ये जोराची धडक झाली. त्यात राजू धांडेचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील हिरालाल धांडे, संतोष व त्याचा मित्र उत्तम हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती शिरपूरचे उपसरपंच ऋषभ घाडगे यांना मिळताच त्यांनी जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
बॉक्स
ती म्हणाली, पोलिसांनी बोलाविले होते धारणीला
राजूचे वडील हिरालाल धांडे त्यांचे लहान भाऊ बाबूलाल धांडे हे राजूच्या वडिलांशी वारंवार दारू पिऊन भांडत होते, त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. त्याबाबत मागील सोमवारी हिरालाल धांडे यानी बाबूलाल धांडे यांची धारणी पोलिसात तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने धारणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी काळ.................... राजूकडे जाऊन आले. त्यांनी राजू व त्याच्या वडिलांना सोमवारला पोलिस स्टेशनला बोलाविले. त्यामुळे राजू हा धारणी पोलीस स्टेशनला आला होता. तेथून काम झाल्यांनतर गावाला परत जाताना त्याचा अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस स्टेशनला काय झाले याची माहिती आई व बहीण यांना मिळाली तर नाही पण एकुलता एक मुलगा याचा मृतदेह डोळ्याने दिसला. त्यांनतर दोघींनीही टाहो फोडला.
बॉक्स
संतोष आला होता वडिलांच्या शोधात
चिचखेडा येथील संतोष मांडीकर याचे वडील व भाऊ बासाच्या टोपल्या विणण्याचे काम करतात. ते धारणी तालुक्यात कामाच्या शोधात दोन दिवसांपासून आले असल्याने संतोष व त्याचा मित्र उत्तम हे दोघे सोमवारी दुपारी वडील व भावाच्या शोधात धारणीला येत होते. त्या दरम्यान दोन बाईकमध्ये जोराची धडक बसल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.