शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

मुख्यमंत्री दत्तक गावात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 10:07 PM

तालुक्यातील शिरजगाव मोझरी गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाला विशेष सुविधा मिळतील व गावाचा विकास झपाट्याने होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती.

ठळक मुद्देग्रामस्थांची हाक ऐकणार कोण ? : चार दिवसाआड पाणीपुरवठा, हातपंप निकामी

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शिरजगाव मोझरी गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावाला विशेष सुविधा मिळतील व गावाचा विकास झपाट्याने होईल, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र, त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी अधिग्रहित केलेले बोअरवेलचे पाणीदेखील अचानक आटले. दोन-तीन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सोसत असलेल्या शिरजगाववासीयांना मे महिन्यात काय होणार, असा प्रश्न पडला आहे.शिरजगाव मोझरी येथे एकच विहीर असून, त्यामध्ये अधिग्रहित केलेल्या बोअरवेलचे थोडे पाणी साठवून, नंतर टाकीतून गावासाठी पुरवठा होतो. गावातील एकूण १४ हातपंपांपैकी तीन हातपंपांचे पाणी पिण्यायोग नाही. काही हातपंप भंगार अवस्थेला पोहोचले, तर काही आटले आहेत. गावातील नळयोजनेचे पाणी पाच ते सहा दिवसानंतर मिळते. तेही अपुरे पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ उन्हातान्हात दूरदुरून पाणी आणत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी गावातीलच सदानंद भालेराव यांनी विहिरीसाठी जागा दिली. विहिरीचे काम चालू झाले. परंतु, इतक्या दिवसापासून ते काम अजूनही पूर्ण झाले नाही. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत अशीच स्थिती असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे.पाण्यासाठी लागले गुन्हेमागील उन्हाळ्यात शिरजगाव मोझरी येथील ग्रामस्थांनी पाणी समस्येवर ग्रामपंचायतला कुलूप ठोकले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांवरदेखील गुन्हे दाखल केले होते. अजूनही गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी आता पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत गावकरी आहेत.प्रशासनाच्या सहकार्याने योजना सहा महिन्यांत होऊ घातली आहे. जमिनीतच पाणी नसल्याने टंचाई आहे. म्हणून भूजलपातळी वाढवण्यासाठी कामे हातात घेतली आहेत. त्याअंतर्गत कामे जून अखेरीस पूर्ण होतील.- स्वप्निल देसले, मुख्यमंत्री प्रतिनिधी, शिरजगाव मोझरी