शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

लॉकडाऊनमध्ये मेळघाटात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:35 IST

लॉकडाऊनमध्ये मेळघाटात पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. वाघ, अस्वल, बायसन, सांबर, पक्षी, फुलपाखर, गरूड, नीळकंठ पक्षी, निलगाय, हरिण एवढेच नव्हे, तर कोब्राही ट्रॅप कॅमेरात लॉक झाला आहे.

ठळक मुद्देकोबराही कॅमेऱ्यात लॉकडाऊन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लॉकडाऊनमध्ये मेळघाटात पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याने वन्यजिवांचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. वाघ, अस्वल, बायसन, सांबर, पक्षी, फुलपाखर, गरूड, नीळकंठ पक्षी, निलगाय, हरिण एवढेच नव्हे, तर कोब्राही ट्रॅप कॅमेरात लॉक झाला आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह, हरिसाल, कोलकाज, चिखलदरा, आमझरी, शहानूर, धारगड, अंबाबरवा, वान, नरनाळा, ढाकणा, चौरकुंड, हतरू, तारूबांदा, रायपूर ही पर्यटनक्षेत्रे आहेत. यातील काही भागांत गावकऱ्यांसह वाहनांची वर्दळ, ये-जा तर निश्चित पर्यटन क्षेत्रात (मार्गावर) पर्यटकांना घेऊन फिरणाऱ्या जिप्सी यामुळे वन्यजिवांचा मुक्तसंचार मंदावला होता.दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिलपर्यंत पर्यटन बंद ठेवण्यात आले आहे. गावकऱ्यांना जंगलबंदी करण्यात आली आहे. कुणालाही प्रवेश नाही. वाहनांची वर्दळ नाही. यात जंगलात सर्वत्र नीरव शांतता पसरली आहे. केवळ वन्यजिवांना हे रान मोकळे आहे.चिखलदरा पर्यटन क्षेत्रासह चिखलदरा, ढाकणा, गाविलगड, धारगड, शहानूर वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन्यजीव रस्त्यांवर येत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर भैलूमे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आपल्या सहकाऱ्यांसमवेत स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. गाविलगड वनपरिक्षेत्रात तर कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघीण आपल्या दोन बछड्यांसह कैद झाली आहे.वन्यजिवांची संख्या वाढीवरवन्यजिवांचे संवर्धन व रक्षण करतानाच वनकर्मचारी जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावरील पाण्यावर लक्ष ठेवून आहे. या कृत्रिम पाणवठ्यात ते क्षेत्रीय कर्मचारी पाणी भरून ठेवत आहेत. भर उन्हाळ्यातही वन्यजिवांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. नैसर्गिक पाणवठ्याच्या स्वच्छतेकडे व त्यातील पाण्याच्या स्वच्छतेकडे वन कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. यात वन्यजिवांची संख्या वाढली असून, त्यांचे दर्शन होत आहे.कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यापासून तर आगीपासून जंगलात संरक्षण करण्यापर्यंतची उपाययोजना क्षेत्रीय कर्मचारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात करण्यात येत आहे

टॅग्स :wildlifeवन्यजीवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस