शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपुरा पाऊस, उद्ध्वस्त खरीप, दुष्काळाचे सावट; पश्चिम विदर्भात विदारक स्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:41 IST

पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात सरासरीच्या ११५ मिमी पाऊस कमी झाल्याने खरिपाचे पीक करपले आहे. भूजलात मोठी तूट असल्याने रबीचा हंगामही धोक्यात आहे. ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण संचय पातळीच्या निम्म्यावर असणारा जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. सलग चार वर्षांपासून नापिकीच्या झळा सोसणाºया वºहाडात दरदिवशी तीन शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.पश्चिम विदर्भात पावसाच्या चार महिन्यात ७७८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ६६३ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीइतका, तर अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला. विशेष म्हणजे, १० आॅगस्टपासून ४५ दिवस पावसाचा खंड राहिल्याने किमान १० लाख हेक्टरमधील सोयाबीन, ६० हजार हेक्टरवरील मूग व ५० हजार हेक्टरवरील उडिदाचे पीक जागीच करपले. सहा लाख हेक्टरमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रकोप यंदाही असल्याने कपाशीचे सरासरी उत्पादन किमान ४० टक्क्यांनी घटणार आहे. भूजल पातळीदेखील खोल गेल्याने सध्या बुलडाणा जिल्ह्यात आठ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. 

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या २५० दिवसांत ७५० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. सर्वाधिक २२१ शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. बहुधा यंदा राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बुलडाणा जिल्ह्यात झाल्यात. अमरावती १६५, अकोला ९६, यवतमाळ १४८, वाशिम ५७ व वर्धा जिल्ह्यात ६३ शेतकºयांनी आत्महत्या केली.

अडीच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतकर्जमाफी  योजनेसाठी विभागातील ९ लाख ७२ हजार १३७ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज केलेत. १५ महिन्यांच्या अवधीत ७ लाख ११ हजार ६९८ शेतकºयांना ३६१४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. अद्याप २ लाख ६० हजार ४३९ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.

५३६० कोटींचे वाटप रखडलेयंदाच्या खरिपासाठी विभागातील बँकांना ८२६३ कोटींचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. ३० सप्टेंबरला खरीप हंगामाचे कर्जवाटप संपले. बँकांनी  ३ लाख ९० हजार १९६ शेतकºयांना २९०३ कोटींचे वाटप केले, तर तब्बल ५३६० कोटींचे वाटप झालेले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पाची स्थिती गंभीरविभागातील ४९९ प्रकल्पांमध्ये पूर्ण जलसंचय पातळीच्या तुलनेत ६३ टक्के साठा शिल्लक आहे. यामध्ये नऊ मुख्य प्रकल्पांमध्ये ६० टक्के, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१ टक्के, तर ४६६ लघू प्रकल्पांमध्ये ६३ टक्केच साठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, पलढग, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती