शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या लगीनघाईने पालिकेचा मांडव गजबजला

By admin | Updated: October 25, 2016 00:06 IST

निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

जिल्हाभरात पालिकांना यात्रेचे स्वरुप : हवशा, नवशा, गवशांची चंगळ अमरावती : निवडणुकीची घोषणा होताच सर्वत्र राजकीय मातब्बरांसह इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे. कट्टयांवर निवडणुकीच्याच चर्चा रंगत आहेत. निवडणुकीच्या लगीनघाईमुळे ओस पडलेले जिल्हाभरातील पालिकेचे मांडव गजबजू लागले आहेत. यामुळे पालिकांना जत्रेचे स्वरूप आले असून प्रत्येकजण आपापले गणित जुळवून लॉबिंग करीत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १९२ नगरपालिका व २० नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. चार टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांचे मतदान २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे मागील दोन महिन्यांपासून चोरी-चोरी चुपके-चुपके सुरू असलेले लॉबिंग आता उघडपणे दिसू लागले आहे. पालिका निवडणूक म्हणजे राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचे पहिले पाऊल समजले जाते. यामध्ये आपापल्या भागात असणारे वजन तसेच नेतेगिरी यातून दाखवून देता येते. पालिका निवडणुकीत एक-एक मत मोलाचे असल्याने गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनाही सुगीचे दिवस येतात. त्यातच यावेळी नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्षपदासाठीही थेट जनतेतून मतदान होणार असल्याने हवसे, नवसे गवस्यांची चांगलीच चंगळ होणार होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पांढऱ्या कपड्यांची मागणी वाढली असून चौकाचौकात राजकीय समीकरणा बाबतच्या चर्चा रंगत आहेत. त्याचबरोबर इच्छुकांकडूनही गणित जुळविणे सुरू असून सर्वत्र पालिका निवडणुकीचीच रणधुमाळी दिसून येत आहे. (प्रतिनिधी)इच्छुकांची पालिकेत वर्दळनगर पालिका क्षेत्रात वर्दळ वाढली आहे. निवडणुकीत आपणही कसे शर्यतीत आहोत, हेच दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करीत आहे. अनेक इच्छुकांनी निवडणुकीत अडचण नको म्हणून पालिकेची घरपट्टी, नळपट्टी व इतर काही देणे असेल तर ते भरण्याच्या अनुषंगाने विचारपूस सुरू केली आहे. एकंदरीत पालिकेचा मांडव इच्छुकांच्या लगीनघाईने गजबजू लागल्याचे दिसत आहे. लवकरच या निवडणुकीला रंगत येईल. नामांकन प्रक्रियेला सुरूवात झाली असली तरी खरी रंगत यापुढेच येणार आहे. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्यापालिकेच्या मागील पंचवार्षिक योजनेचा आढावा घेतल्यास प्रत्येक पालिकेत बोटावर मोजण्याइतपतच नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर तोंड उघडले. यातील बहुतांश लोक पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इच्छुक मतदारांच्या गल्लोगल्ली जाऊन भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करीत आहेत.