पोलिसांशी हुज्जत अन् दारूचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 06:00 IST2020-01-12T06:00:00+5:302020-01-12T06:00:35+5:30
खोलापुरी गेटचे पोलीस हवालदार सुधीर लक्ष्मण प्रांजळे (ब.नं. ९३३) हे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास पोलीस पथकासह भाजीबाजार चौकात गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सांभाळत होते. यादरम्यान दुचाकीवरून दोन तरुण पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन जात असल्याचे सुधीर प्रांजळेंना दिसले. दुचाकीस्वारावर संशय बळावल्याने त्यांना थांबण्यासाठी इशारा केला.

पोलिसांशी हुज्जत अन् दारूचा भंडाफोड
अमरावती : संशयास्पद दुचाकी थांबविताच त्यावरील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. दुचाकीने कट मारून एकाने पळ काढला, तर दुसरा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याजवळील नायलॉन पोत्याची झडती घेतल्यावर अवैध दारूचा मुद्देमाल सापडला. अंगझडतीत लोखंडी चाकूही आढळून आला. शुक्रवारी रात्री भाजीबाजार चौकात ही घटना घडली.
खोलापुरी गेटचे पोलीस हवालदार सुधीर लक्ष्मण प्रांजळे (ब.नं. ९३३) हे शुक्रवारी रात्री ९.३० च्या सुमारास पोलीस पथकासह भाजीबाजार चौकात गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सांभाळत होते. यादरम्यान दुचाकीवरून दोन तरुण पांढऱ्या रंगाचे पोते घेऊन जात असल्याचे सुधीर प्रांजळेंना दिसले. दुचाकीस्वारावर संशय बळावल्याने त्यांना थांबण्यासाठी इशारा केला. मात्र, त्यांनी न थांबविता दुचाकीने भरधाव वेगाने कट मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुधीर प्रांजळे यांच्या हाताला मार लागला. तरीसुद्धा त्यांनी दुचाकीला थांबवून जाब विचारला. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. याच वेळी मंगेश शिरभाते नामक आरोपी दुचाकी घेऊन पळाला, तर दिनेश ऊर्फ चाऊ राजेश शिरभाते (२३, आमलेवाडी, महाजनपुरा) हा पोलिसांच्या हाती सापडला. पोलिसांनी त्याच्याकडील पोत्याची झडती घेतली असता, त्यात देशी दारूच्या ८८ बॉटल आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ चाकूसुद्धा मिळाला. पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. हवालदार प्रांजळेंच्या तक्रारीवरून दिनेश व त्याचा भाऊ मंगेश शिरभाते (२५) विरुद्ध शासकीय कामात अडथळा, मोटार वाहन कायदा, महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि ४/२५ आर्म्स अॅक्टचा गुन्हा नोंदविला.