दारू पिऊन वाहनचालक तर्राट (असाईनमेंट)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:14 IST2021-07-07T04:14:56+5:302021-07-07T04:14:56+5:30
दीड वर्षांत १३५ कारवाया, लॉकडाऊनमुळे मद्यपींचे फावले प्रदीप भाकरे अमरावती : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने व त्यातून ...

दारू पिऊन वाहनचालक तर्राट (असाईनमेंट)
दीड वर्षांत १३५ कारवाया, लॉकडाऊनमुळे मद्यपींचे फावले
प्रदीप भाकरे
अमरावती : मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे धोकादायक असल्याने व त्यातून अपघातासारखे गंभीर प्रकार घडत असल्याने पोलीस प्रशासनाची तळीरामांवर करडी नजर राहते. दैनंदिन कारवाईसोबतच पोलिसांकडून तळीरामांविरोधात ‘थर्टी फर्स्ट फीव्हर’ उतरेपर्यंत शहरात कठोर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, कोरोना संक्रमण, लॉकडाऊनने पोलिसी कारवाईवर मर्यादा आणल्या आहेत. ब्रीथ अॅनालायझरचा बंद केलेला वापर व मास्कच्या वापरामुळेदेखील मद्यपींची तपासणी थंडावली आहे.
शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेतर्फे फिक्स पॉईंट लावून ब्रीथ अॅनालायझर मशीनद्वारे तळीरामांची चाचणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. ‘थर्टी फस्ट’च्या सुमारास या कारवाईला वेग यायचा. मात्र, यंदा ब्रीथ अॅनालायझर मशीनद्वारे होणारी तपासणी बंद करण्यात आली. जे उघड्या डोळ्याने झिंगलेले दिसले, त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली. आता कोरोना संक्रमण हळूहळू कमी होत असल्याने या कारवाईवर भर दिला जाणार आहे, असे वाहतूक पोलीस शाखेकडून सांगण्यात आले.
बॉक्स
ब्रीथ अॅनालायझरचा वापर बंद
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून ब्रीथ अॅनालायझरचा वापर बंद करण्यात आला. शिंकल्यास, खोकल्यातून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागत असल्याने तो निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता केवळ भरधाव वेगाने वाहन हाकणारे, नो पार्किंगवरील वाहने लक्ष्य केली जात आहेत.
२०२१ मध्ये मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई (जुनपर्यंत)
जानेवारी २२
फेब्रुवारी ०९
मार्च २६
एप्रिल ०
मे ०
जून ०
---------------
मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई २०२०
जानेवारी १
फेब्रुवारी १
मार्च ०
एप्रिल ०
मे ०
जून ०
जुलै ०
ऑगस्ट ०
सप्टेंबर ०
ऑक्टोबर १४
नोव्हेंबर २०
डिसेंबर ४२
---------------
कोट
गतवर्षी मार्चपासून कोरोना संक्रमण व पाठोपाठ लॉकडाऊन लागले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, ब्रीथ अॅनालायझरचा वापर बंद करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२० मध्ये दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यंदादेखील पहिल्या तीन महिन्यांत कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने कारवाईवर मर्यादा आल्या.
किशोर सूर्यवंशी
-------------------