वाळलेले झाड अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST2021-02-14T04:13:14+5:302021-02-14T04:13:14+5:30

पान ३ साठी नेरपिंगळाई : अमरावती ते वरुड रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याशेजारील वाळलेली झाडे न तोडल्यामुळे ...

Dried tree invites accident | वाळलेले झाड अपघाताला निमंत्रण

वाळलेले झाड अपघाताला निमंत्रण

पान ३ साठी

नेरपिंगळाई : अमरावती ते वरुड रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याशेजारील वाळलेली झाडे न तोडल्यामुळे पादचारी व वाहनधारकांना ते जीवघेणे ठरत आहेत. संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

मोर्शी ते येरला परिसरात रस्त्यावरील झाडे पूर्णत: वाळलेली आहेत. त्या झाडाखालून अनेकांना मोर्शी वरुड पांढुर्णा हा ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो. भविष्यात कुठल्याही पादचारी किंवा वाहन धारकाच्या अंगावर या वाळलेल्या झाडांच्या फांद्या तुटून अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल ग्रामस्थ तथा वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Dried tree invites accident