नाट्यश्रुंगाराचे दुकान खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:45 IST2018-03-28T22:45:33+5:302018-03-28T22:45:33+5:30

साबणपुरा येथील नाट्यश्रुंगाराच्या दुकानाला बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळाला. अग्निशमनच्या पाच बंबांनी दोन ते तीन तास पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.

Drama shop | नाट्यश्रुंगाराचे दुकान खाक

नाट्यश्रुंगाराचे दुकान खाक

ठळक मुद्देभीषण आग : पाच बंबाने आग नियंत्रणात

आॅनलाईन लोकमत
अमरावती : साबणपुरा येथील नाट्यश्रुंगाराच्या दुकानाला बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळाला. अग्निशमनच्या पाच बंबांनी दोन ते तीन तास पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला.
नवीन सोनी यांच्या या प्रतिष्ठानात कलावंतासाठी साहित्य विक्री केली जाते तसेच गोडावूनसुद्धा होते. बुधवारी सकाळी अचानक दुकानातून आगीचे लोळ येताना दिसले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वात पथक घटनास्थळी बंबासह पोहोचले. दोन ते तीन तास पाण्याचा मारा केल्यावर आग नियंत्रणात आली. आगीत शिलाई मशीन, नाट्यसाहित्य, ज्वेलरी साहित्य, ड्रेस, फेटे, वॉटर कूलर, संगणक, तीन एलसीडी, सीसीटीव्ही कॅमेरा व किट, दोन साधे टीव्ही, दीड लाखांची रोख, कापडाचे दहा बंडल, चेन, धागे, कटिंग मशीन सात नग, तयार कपड्यांचा माल असा लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

Web Title: Drama shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.