नाल्यात अडकला मिनीट्रक
By Admin | Updated: July 23, 2016 23:56 IST2016-07-23T23:56:53+5:302016-07-23T23:56:53+5:30
पळसखेड-चांदूररेल्वे मार्गावरील नाल्याच्या पुरात मिनीट्रक अडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये चालकासह तिघेही सुखरुप बचावले.

नाल्यात अडकला मिनीट्रक
चालकासह तिघे बचावले : पळसखेड-चांदुररेल्वे मार्गावरील घटना
चांदूररेल्वे : पळसखेड-चांदूररेल्वे मार्गावरील नाल्याच्या पुरात मिनीट्रक अडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये चालकासह तिघेही सुखरुप बचावले.
तालुक्यात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चांदूररेल्वे-पळसखेड मार्गावरील नाल्याला पूर आला. नाल्यावरून पाणी वाहत असताना वाहनचालक सुधिर ज्ञानेश्वर डोंगरे याने मिनीट्रक पलिकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला नाल्यावरील रपट्याचा अंदाज न आल्याने काही अंतरापर्यंत हा मिनीट्रक गेला. मात्र, नाल्याच्या मधोमध गेल्यानंतर मिनीट्रक वाहून जात असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालक सुधीर डोंगरे, आशीष सहारे, सुरेश सहारे, गजानन घोडमारे (सर्व राहणार आमलाविश्वेश्वर) यांनी वाहनाबाहेर उड्या घेऊन प्राण वाचविले. हा मिनीट्रक गजानन गुलाबराव घोडमारे (रा. आमला विश्वेश्वर) यांच्या मालकीचा असून सुरेश भागवत सहारे यांचे घरगुती साहित्य नेरपंरसोपंतला पोहोचवून दिल्यानंतर ते आमला विश्वेश्वरला परत येत होते. मात्र, नाल्याच्या पुराचा अंदाज न आल्याने हा मिनी ट्रक पुराच्या पाण्यात आडवा झाला. ठाणेदार गिरीष बोबडे, नायब तहसिलदार दिनेश बढीये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (तालुका प्रतिनिधी)