प्रवीण पवार यांना डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 16:48 IST2018-06-07T16:48:01+5:302018-06-07T16:48:01+5:30

बंगळुरूत झालेल्या कार्यक्रमात प्रवीण पवार यांचा गौरव

dr pravin pawar awarded with dr apj abdul kalam national life time achievement award | प्रवीण पवार यांना डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 

प्रवीण पवार यांना डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार 

वरूड (अमरावती) : वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयातील डॉ. प्रवीण शरद पवार यांना अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणारा हा पुरस्कार प्रथमच अमरावती जिल्ह्याला मिळाला आहे. शिक्षण, संशोधन आणि निबंध प्रकाशनात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला असून, बेंगळुरू येथे झालेल्या पुरस्कार समारंभात नीती आयोगाचे माजी सल्लागार आणि संस्थेचे अध्यक्ष एच. व्ही. शिवाप्पा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: dr pravin pawar awarded with dr apj abdul kalam national life time achievement award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.