शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला पाच हजारांचा दंड

By admin | Updated: May 7, 2015 00:07 IST

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिवाजी संस्थेद्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला ...

अमरावती : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिवाजी संस्थेद्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींनी विद्यापीठाकडे दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला आहे. माजी अधिष्ठाता पद्माकर सोमवंशींना अधिष्ठाता पदावर रुजू करण्याचे आदेश विद्यापीठाने दिले होते. मात्र, संस्था चालकाने सोमवंशींना रुजू होऊ दिले नाही. महिनाभरापासून अधिष्ठातापदाचे ‘रुजू’ नाट्य सुरुच होते. त्यामुळे सोमवंशींनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे दाद मागण्यासाठी ६ एप्रिल रोजी पत्र पाठविले होते. यावर विद्यापीठाने पीडीएमसी प्रशासनाला उत्तर मागितले होते. मात्र, पीडीएमसीकडून नाशिक विद्यापीठाला काहीच कळविले गेले नाही. ही बाब गंभीर असल्याचे विद्यापीठाद्वारे प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे. याच श्रुंखलेत सोमवंशींनी २० एप्रिल रोजी पुन्हा ई-मेलद्वारे पत्र पाठवून रूजू करून घेण्याबाबत होणारी हयगय आणि गलथान कारभाराबद्दल नाशिक विद्यापीठाला कळविले होते. त्यानंतर नाशिक विद्यापीठाने पीडीएमसी व्यवस्थापनाने आदेशांची अवहेलना केल्याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी पीडीएमसीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १५ दिवसांच्या आत विद्यापीठाकडे दंड पाठविण्यात यावा. अन्यथा विद्यापीठ निर्देश क्रमांक ०५/२०१२ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्याचा इशारा देखील नाशिक विद्यापीठाने दिला आहे. याबाबतचे पत्र कुलसचिव काशिनाथ गर्कळ यांनीे पीडीएमसी प्रशासनाला पाठविले आहे. (प्रतिनिधी)वारंवार दंडात्मक कारवाईडॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या ना त्या कारणांनी सतत चर्चेत असते. डॉ.भाऊसाहेब देशमुखांनी सामान्यांच्या गरजांसाठी उच्चशिक्षणाची सोय अमरावतीत करून दिली. परंतु येथे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. परिणामी वारंवार दंडात्मक कारवाईची नामुष्की ‘पीडीएमसी’ वर येत आहे. आतापर्यंत अनेकदा अशी कारवाई महाविद्यालयावर झाली आहे.