डॉ. आंबेडकरांना गुरुसिद्धी संगीत विद्यालयाची सुरांची मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:37 IST2020-12-11T04:37:29+5:302020-12-11T04:37:29+5:30

तिवसा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुसिद्धी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरांनी श्रद्धांजली वाहिली. ...

Dr. Gurusiddhi Sangeet Vidyalaya pays homage to Ambedkar | डॉ. आंबेडकरांना गुरुसिद्धी संगीत विद्यालयाची सुरांची मानवंदना

डॉ. आंबेडकरांना गुरुसिद्धी संगीत विद्यालयाची सुरांची मानवंदना

तिवसा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुसिद्धी संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक संगीत उपासक होते स्वत: व्हायोलिन तसेच हार्मोनियम वाजवित होते. म्हणून त्यांच्या संगीत साधनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांनी एक सुंदर सुरांची मैफिल महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या प्रतिमेसमोर सादर केली. त्यात गायक म्हणून स्नेहांशू हेंडवे. हार्मोनियम धार्मिक इंगोले, तबला उपदेश इंगोले, ढोलक निशांत भालेकर, कोरस ऋषीकेश कावळे, सहगायक मोहन इंगोले आदींनी ''शांत झोपू दे सागरा कुंभारापरी तू भीमा'' अशा प्रकारची डॉ. बाबासाहेबांनी समाजाला जी शिकवण दिली जे जीवन घडविले अशा संदर्भाकीत सुरेल सुरांनी श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आयोजन कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन संगीत विद्यालयाचे प्रमुख मार्गदर्शक सुनील इंगोले यांनी केले. यावेळी संस्थापक बलदेवराव इंगोले हजर होते.

Web Title: Dr. Gurusiddhi Sangeet Vidyalaya pays homage to Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.