डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला पुस्तके भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:06 IST2021-08-02T04:06:06+5:302021-08-02T04:06:06+5:30

तालुका प्रतिनिधी/फोटो आहे फोटो - अग्रवाल १ पी चांदूर रेल्वे : सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल व माजी नगराध्यक्ष अंजली ...

Dr. Books gift to APJ Abdul Kalam Abhyasika | डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला पुस्तके भेट

डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला पुस्तके भेट

तालुका प्रतिनिधी/फोटो आहे

फोटो - अग्रवाल १ पी

चांदूर रेल्वे : सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल व माजी नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेची पुस्तके दान दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अभ्यासिकेच्या प्रांगणात वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू केली. त्यासाठी काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेची पुस्तकेसुद्धा पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी उपलब्ध केली. याशिवाय दानदात्यांना पुस्तके भेट करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यासह नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, सहायक उपनिरीक्षक राऊत, उपनिरीक्षक शिवाजी घुगे, सुधीर तायडे, हर्ष अग्रवाल यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ठाणेदार मगन मेहते व सहायक पोलिस निरीक्षक राऊत तसेच पत्रकारांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन अनूप वानखडे यांनी केले. एएसआय संजय राठोड, अविनाश देशमुख, जमादार रामेश्वर चव्हाण, सुरेंद्र वाकोडे, सत्यम सोळंके, भूषण विकार, सागर गुल्हाने, नितेश वानखडे, विशाल ढवळे, अविनाश राठोड यांनी परिश्रम घेतले‌.

010821\img-20210728-wa0050.jpg

photo

Web Title: Dr. Books gift to APJ Abdul Kalam Abhyasika