अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:50 IST2020-09-14T22:48:35+5:302020-09-14T22:50:01+5:30

अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. दर तीन दिवसांत संक्रमितांची संख्या १००० पार होत आहे.

Double centenary of corona deaths in Amravati district | अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

ठळक मुद्देसोमवारी सहा मृत्यूसंक्रमितांची संख्या नऊ हजारांवर


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाग्रस्तांची संसर्ग वाढत असतांना उपचारदरम्यान दगावलेल्या रुग्णांची संख्य देखील वाढतीच आहे. सोमवारी सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने ही मृत्यूसंख्या आता २०४ वर पोहोचली आहे. सोमवारी ३११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. दर तीन दिवसांत संक्रमितांची संख्या १००० पार होत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार उत्तमनगरातील ६५ वर्षीय पुरुष, मोर्शी येथील ६५ वर्षीय महिला, वरुड तालुक्यातील मंगरुळी येथील २९ वर्षीय पुरुष, शेंदूरजना खूर्द येथील ६० वर्षीय पुरुष, बडनेरा येथील ६० वर्षीय पुरुष व सार्सी येथील ४१ वर्षीय पुरुषाचा उपचारदरम्यान मृत्यू झालेला आहे. सप्टेंबर महिण्याच्या १४ दिवसांत तब्बल ६९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे.

कोरोनााच संसर्ग दिवसेनदिवस वाढतच चालला आहे. सोमवारी विद्यापीठाद्वारा २६४ व रॅपीड अन्टीजनचे ४७ असे एकू ण ३११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९०८५ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

पुन्हा ३११ पॉझिटिव्ह
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार सोमवारी ३११ कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकू ण संख्या ९०८५ वर पोहोचली आहे. उपचारानंतर बरे वाटल्याने ३९८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने कोरोनामुक्त व्तक्तींची संख्या ७०९१ वर पोहोचली आहे या सर्व व्यक्तींना आता १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १४५४ रुग्ण विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: Double centenary of corona deaths in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.