शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच सिलिंडरचे वजन करता का?

By admin | Updated: May 30, 2015 00:34 IST

स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीलाा ...

गॅस चोरीची शक्कल न्यारी : गॅस एजन्सी कर्मचाऱ्यांबाबत साशंकताअमरावती : स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची मर्यादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीलाा लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. गॅस घरपोच देणारा कर्मचारी भरलेल्या सिलिंडरमधून बेमालूमपणे गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याचा प्रकार अनेकदा उघड झाला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन तसेच वाहनात भरुन जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही शहरात समोर आले आहेत. त्यामुळे कमी वजनाचा गॅस आपल्या माथी मारुन एजंटने फसवणूक केल्याची नागरिकांची भावना झाली आहे. अगोदरच महागाई त्यात अशा प्रकाराने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिलिंडर दरात फसवणूकगॅस संपला तर लगेच मिळायला हवा. परंतु अनेकदा तो दिला जात नाही. मात्र, दुसरीकडे गॅस सिलिंडर काळाबाजारात राजरोस विकला जातो. यामुळे तुटवडा निर्माण होतो. घरगुती विनाअनुदानित गॅससाठी ४७० रुपये घेतले जातात. घरगुती गॅसचे वजन १४.६ किलो असते. परंतु अनेकदा तो कमी भरतो. काही टोळ्या हा गॅस काढून घेत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर देताना त्यांचे वजन करुन दिले पाहिजे. पण, किती एजन्सीज हा नियम पाळतात, हा प्रश्न आहे. एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारातअनेक ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नाही. घरगुती सिलिंडर व्यावसायिकांना विकून पैसा कमविण्याचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. अशा वेळी एजन्सीवाले काय करतात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उलट काही एजन्सीवाले गॅसच्या काळाबाजारात सहभागी होऊन नफेखोरी करतात, असे आरोप ग्राहकांकडून केले जात आहेत. पुरवठा विभागाकडून अपेक्षित कारवाई होत नाही. त्यामुळे गॅसचा काळाबाजार सुरूच आहे. सर्वच गॅसच्या एजन्सीज त्यात सहभागी नाहीत. काही चांगल्या पद्धतीने काम करुन ग्राहकांना नियमित व वेळेवर गॅसचा पुरवठा करतात. पण त्यांची संख्या कमी आहे. गॅसचा हा काळाबाजार वाढला असला तरी गॅसचा होणारा अनधिकृत वापर हा तर काळ्याबाजारापेक्षाही धोकेदायक बनू लागला आहे. गॅसचा वाहनांसाठी होणारा व्यापार अत्यंत घातक आहे. अनेकदा या गॅसच्या वापरामुळे वाहनांचा स्फोट होऊन अपघात झाले आहेत. वेळेवर सिलिंडर मिळत नाहीशहरातील काही एजन्सीचे घरपोच गॅस देणारे एजंट सिलिंडर बुकिंग केल्यानंतरही सुमारे आठ दिवस संबंधित ग्राहकांना सिलिंडर देत नाहीत. असे सिलिंडर बुकिंगनंतर लगेच काळाबाजार करुन अनधिकृत केंद्राला जादा दराने विकले जातात. तर पुढच्या ग्राहकाचे सिलिंडर पहिल्या ग्राहकाला दिले जाऊन पुढचा ग्राहक आठ दिवस वेटिंगवर ठेवला जातो. असा राजरोस काळाबाजार शहरात सुरू आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नाही. ग्राहकांची ससेहोलपट सतत केली जाते.