रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:50+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात तपासणीकरिता जाताय की संभाव्य ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न रुग्णांना केला जात आहे.

रुग्णालयात उपाचारासाठी जाताय की ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वातावरणातील बदलांमुळे सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीचे आजार बळावले आहे. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. मात्र, ओमायक्रॉनची भीती निर्माण झाल्याने पुन्हा तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सुरक्षितता बाळगण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात तपासणीकरिता जाताय की संभाव्य ओमायक्रॉन घरी आणण्यासाठी, असा प्रश्न रुग्णांना केला जात आहे.
नो सोशल डिस्टन्सिंग
कोरोनापासून स्वत:ला सावरण्याकरिता सोशल डिस्टंसिंग पाळणे अनिवार्य आहे. परंतु आता ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाल्यानंतरही रुग्णालयात या नियमांना फाटा दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
ना मास्क
ना डिस्टंसघराबाहेर पडताना प्रत्येकाने चेहऱ्यावर मास्क लावणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक बिनधास्त वागताना दिसून येत आहे. बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी तोंडाजवळ तोंड आणताना विनामास्क वावरू लागल्याचे दिसून येत आहे.
या आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्या
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाकाळापासूनच जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी रुग्णालयात विनामास्क आढणाळ्या नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करी आहेत. मात्र, रुग्णांसह त्यांचे नातेवाईक काही मास्क घालत असले तरी ते हनुवटीवरच लावताना दिसून आले.
- श्यामसुंदर निकम, सीएस