शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वान भक्षण प्रकरणाची चौकशी आरंभणार आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी श्रीनाथवाडीतील रहिवाशांचे दोन श्वान चोरून नेले होते. त्यापैकी हनुमान शेळकेंचा श्वान त्यांनी क्रूरपणे मारून खाल्ले, तर पुष्पा लांडगे यांचे ब्राऊनी नामक श्वान ...

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अध्यक्ष : कारवाईचे अधिकारही समितीलाच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वान भक्षण प्रकरणाची चौकशी आरंभणार आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांनी श्रीनाथवाडीतील रहिवाशांचे दोन श्वान चोरून नेले होते. त्यापैकी हनुमान शेळकेंचा श्वान त्यांनी क्रूरपणे मारून खाल्ले, तर पुष्पा लांडगे यांचे ब्राऊनी नामक श्वान या विद्यार्थ्यांनी हव्याप्र मंडळाच्या वसतिगृहात बांधून ठेवले होते. विद्यार्थ्यांच्या खोलीत शिरून लांडगे यांनी ब्राऊनीला सहीसलामत बाहेर आणले. यावेळी त्या विद्यार्थ्यांनी लांडगे यांना श्वान घेऊन जाण्यासमज्जाव केला. त्या विद्यार्थ्यांचा निर्ढावलेपणा यातून अधोरेखित झाला आहे.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेत जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती कार्यरत आहे. प्राण्यांना क्लेश देण्यासंबंधीची कृत्यांना प्रतिबंध घालणे, हे या समितीचे कार्य आहे.समितीला व्यापक अधिकारयासंबंधाने या समितीने जनजागृती करणे अपेक्षित आहे. या समितीला व्यापक अधिकार आहेत. समितीने प्रभावीपणे कार्य करावे, यासाठीच जिल्हाधिकाºयांना समितीचे अध्यक्षपद बहाल केले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांचाही समावेश असलेल्या या समितीकडे प्राण्यांना क्लेशकारक वागणूक दिली जात असेल तर कुणालाही तक्रार नोंदविता येते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रांतीय विद्यार्थी नेहमीच श्वानचोरी करून निर्दयीपणे त्यांची हत्या करतात आणि त्यांचे सेवन करतात. यासंबंधाने पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाची दखल उल्लेखित समितीचे अध्यक्ष या अधिकाराने जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. पशुसंवर्धन खात्याच्या उपायुक्तांकडून प्रकरणाबाबत काय ते जाणून घेतल्यावर यासंबंधाने कारवाईची दिशा ठरवू, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी 'लोकमत'ला दिली.काय आहेत अधिकार?समितीला व्यापक अधिकार आहेत. स्वत:हून दखल घेऊन ही समिती थेट चौकशी करू शकते. चौकशीत आढळलेल्या तथ्यांनुसार कारवाईचे आदेश जारी करू शकते. ही कारवाई कठोर स्वरुपाचीही असू शकते. प्राण्यांसंबंधीचा क्लेश आणि क्रौर्य रोखणे हाच या समितीचा प्रमुख उद्देश आहे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे समितीचे प्रमुख असल्याने ते कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, अशी आशा प्राणीपे्रमींना आणि श्रीनाथवाडीवासीयांना आहे.दोन महिने कारावास, दोन हजार रुपये दंडमुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ११९ अन्वये श्वानहत्या आणि श्वानभक्षणप्रकरणी दोषींना दोन महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. श्वानाला काठीने मारल्यास थेट अटक करण्याची तरतूद कायद्यात असताना अमरावती शहर पोलिसांनी श्वानाची निर्दयतेने हत्या केल्यावरही कुणालाही अटक केलेली नाही.जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती जिल्ह्यात कार्यरत आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील श्वानभक्षण प्रकरणाबाबत समिती चौकशी करेल.-अभिजित बांगर, जिल्हाधिकारी