जिल्हा बँकेचे नियुक्त प्रशासक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी सिटी कोतवाली ठाण्यात नोंदविल्या तक्रारीवरून जयसिंग राठोड, कर्मचारी राजेंद्र कडू व ब्रोकरसह ११ जणांविरुद्ध ३ कोटी ३९ लाखांच्या या दलाली प्रकरणात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. याचा तपास सध्या शहर आर्थिक गुन्हे शाखा करीत आहेत. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी व ब्रोकर्स यांनी अटकपूर्व जामिनासाठी स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने राठोड व कडू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. म्युच्युअल फंड निप्पान कंपनीचे शाखा व्यवस्थापक अजितपाल मोंगा याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयासमोर मोंगा यांच्या वकिलांनी बाजू सक्षमपणे मांडली. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा बँकेचे सीईओ राठोड, कडू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:16 IST