अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्राचे वितरण
By Admin | Updated: May 20, 2015 01:10 IST2015-05-20T01:10:52+5:302015-05-20T01:10:52+5:30
अपंग जीवन विकास संस्था अमरावतीद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती ...

अपंगांना वैद्यकीय प्रमाणपत्राचे वितरण
धारणी : अपंग जीवन विकास संस्था अमरावतीद्वारा संचालित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व जिल्हा समाजकल्याण कार्यालय जि. प. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मे रोजी धारणी येथील आदिवासी अपंग बांधवांना अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी अपंग बांधवांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉलसुद्धा येथे लावण्यात येणार आहेत. यामधून शासकीय योजनांचे अर्ज व माहितीपत्रक अपंग बांधवांना वितरित केले जाईल. जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून अपंग बांधवास अपंगत्वाचे ओळखपत्र दिले जाईल. याकरिता पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी दाखला, निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी कोणताही एक दाखला व ज्या अपंग बांधवाकडे यापूर्वी मिळालेले अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रत सोबत आणावी. ज्यांच्याकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नाही त्यांनासुद्धा शिबिरात अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण किशोर बोरकर यांच्या मार्गदर्शनात होणार आहे.