धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना ई-चावीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:38+5:302021-06-17T04:10:38+5:30
धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना ई- चावी चे वितरण बीडीओ ने दिलीअजनसिगी येथे चावी धामणगाव रेल्वे ...

धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना ई-चावीचे वितरण
धामणगाव तालुक्यात दीड हजार घरकुलांना ई- चावी चे वितरण
बीडीओ ने दिलीअजनसिगी येथे चावी
धामणगाव रेल्वे
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील दीड हजार घरकुलधारकांना घरकुल प्रवेश अंतर्गत ई-चावी देण्यात आली.
धामणगाव तालुक्यात दीड हजार ग्रामस्थांना घरकुल मंजूर करून त्यांचे घरकुल पूर्ण करून घेण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १, ११६ घरकुल मंजूर करण्यात आले. जे घरकुल पूर्ण झाले त्यांना ई-चावी देण्यात आली. अंजनसिंगी येथे गटविकास अधिकारी माया वानखडे यांच्या हस्ते चावी देण्यात आली. यावेळी सरपंच रुपाली गायकवाड, उपसरपंच अवधूत, दिवे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक दिलीप जोल्हे उपस्थित होते. शेंदूरजना खुर्द येथे सभापती महादेव समोसे, मंगरूळ दस्तगीर येथे उपसभापती माधुरी दुधे, तळेगाव दशासर येथे सरपंच मीनाक्षी ठाकरे, उपसरपंच रमाकांत इंगोले, सचिव जयंत खैर, जळगाव येथे सत्यभामा कांबळे, उपसरपंच गणेश उईके, तळणी येथे विशाल भैसे यांची उपस्थिती होती.