नागरिकांना घरकुलांचे धनादेश वितरित

By Admin | Updated: August 4, 2015 00:07 IST2015-08-04T00:07:13+5:302015-08-04T00:07:13+5:30

महापालिका प्रभाग क्र. ३५ येथील संजय गांधीनगर नं. २, पंचशीलनगर, उत्तमनगर, यशोदानगर, लुंबिनीनगर येथील ...

Distributed checks to households | नागरिकांना घरकुलांचे धनादेश वितरित

नागरिकांना घरकुलांचे धनादेश वितरित

अमरावती : महापालिका प्रभाग क्र. ३५ येथील संजय गांधीनगर नं. २, पंचशीलनगर, उत्तमनगर, यशोदानगर, लुंबिनीनगर येथील घरकूलच्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे लाभार्थी अनेक वर्षांपासून रमाई आवास योजनेपासून वंचित होते.
बसपाच्यावतीने प्रभाग क्र. ३५ चे माजी नगरसेवक मंगेश मनोहरे यांच्या नेतृत्त्वात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी प्रभागातील वंचित लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना घरकूल योजनेचे धनादेश वितरित केले. मनकर्णा आकोडे, रंजना गोपाळा यांच्या खात्यात एक लाखांचा धनादेश महापालिकेने जमा केला. याप्रसंगी बसपाचे अशोक बडगे, उके, दादाराव पाटील, फुलझेले, दिलीप घोडे, लता गोंडाणे उपस्थित होते. याचवेळी काहींना शौचालयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.

Web Title: Distributed checks to households