पेढीप्रकल्पग्रस्तांची जलसंपदा विभागात तोडफोड
By Admin | Updated: June 25, 2014 23:30 IST2014-06-25T23:30:53+5:302014-06-25T23:30:53+5:30
पावसाळा जवळ आला असतानाही जलसंपदा विभागाकडून पेढी नदीचे खोलीकरण केले नाही. आमदारासह पदाधिकाऱ्यांनी सततच्या पाठपुराव्यानंतर नदीपात्रात नादुरूस्त मशीन आणून उभ्या ठेवल्या.

पेढीप्रकल्पग्रस्तांची जलसंपदा विभागात तोडफोड
अमरावती : पावसाळा जवळ आला असतानाही जलसंपदा विभागाकडून पेढी नदीचे खोलीकरण केले नाही. आमदारासह पदाधिकाऱ्यांनी सततच्या पाठपुराव्यानंतर नदीपात्रात नादुरूस्त मशीन आणून उभ्या ठेवल्या. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जलसंपदा विभागात धडक दिली. दोन दिवस कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने अधिकाऱ्याची खुर्ची बाहेर काढून निषेध व्यक्त केला.
वलगाव येथील पेढी नदीच्या काठावर रेवसा, वलगाव, खारतळेगाव, कुंड सर्जापूर, कामुंजा, वझरखेड, रोहणखेड, पर्वतापूर, डोणकसह अन्य गावांना दरवर्षी पुराचा धोका असतो. २००७ मधील पुराने शेकडो घरे वाहून जीवितहानी झाली होती. या ठिकाणी वलगाव विकास आराखड््यांतर्गत नदीचा गाळ काढणे, खोलीकरण करणे, नदीघाटाचे बांधकाम करणे आदी कामांना मंजुरात मिळाली आहे. परंतु जलसंधारण विभागाने काम सुरू न केल्यामुळे तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र २६ मे ला दिले होते.