शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रवी राणा-भाजपमध्ये वाद पेटला; फलकावरील राणांच्या नावाला काळं फासत तोडफोड

By गणेश वासनिक | Updated: April 25, 2023 12:43 IST

भाजपा लोकप्रतिनिधीच्या विकासकामाचे श्रेय रवी राणा घेत असल्याचा आरोप

अमरावती : बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात भाजपच आता मैदानात उतरली असून भाजपचे गटनेते तुषार भारतीय यांनी मंगळवारी साईनगरात लावलेल्या विकास कामाच्या फलकाला काळं फासलं असून त्यामुळे अमरावती शहराचे राजकीय वातावरण तापणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रभागातील नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचं आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते तुषार भारतीय करीत आहे.

तुषार भारतीय यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्र १९ साईनगर येथील सातुर्णा सातुर्णा चौक ते अकोली रेल्वे स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर लावलेल्या फलकाला आपल्या कार्यकर्त्यासह जावून काळं फासलं. आमदार रवी राणांनी नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचे आमदार रवी राणा श्रेय घेत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

जो निधी आम्ही मंजूर केला महानगरपालिकेचा किंवा वेगवेगळ्या निधीतून जो आम्हाला निधी मिळाला त्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले. त्यांना दहा दिवसापूर्वीच अल्टीमीटम दिलं होतं की तुम्ही ते बोर्ड काढून टाका तुमचा त्याच्याशी काही एक संबंध नाही पण त्यांनी काढले नाही त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमाने आम्ही प्रत्यक्ष निरोप पाठवला की ते बोर्ड काढून टाका त्यांनी काढले नाही आम्ही काम करायचं आणि फक्त दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं हे काम भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही आणि म्हणून आज आम्ही त्याच्या बोर्डाला काळं फासलं आहे, असे तुषार भारतीय म्हणाले. बडनेरा मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी असं कृत्य केलं असेल त्या त्या ठिकाणी सुजान नागरीक आणि भाजपचा कार्यकर्ता आणि इतर कुठलेही नगरसेवक असा प्रकार कदापी सहन करणार नाही, असे माजी महापौर चेतन गावंडे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवी राणाBJPभाजपाAmravatiअमरावती