दर्यापुरात "आशा'डे निमित्ताने डीश डेकोरेशन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST2021-02-11T04:13:57+5:302021-02-11T04:13:57+5:30

आमदार बळवंत वानखडे, जि.प.सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी साबळे, तालुका ...

Dish Decoration Competition on the occasion of "Asha 'Day in Daryapur | दर्यापुरात "आशा'डे निमित्ताने डीश डेकोरेशन स्पर्धा

दर्यापुरात "आशा'डे निमित्ताने डीश डेकोरेशन स्पर्धा

आमदार बळवंत वानखडे, जि.प.सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी साबळे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र रहाटे, संजय पाटील, उन्मेश रोडे, सचिन गोळे, शुंभागी राऊत उपस्थित होते.

या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा व डिश डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आल्या. यात १३ आशा वर्कर सहभागी होत्या. डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक संगीता विजय बांबल (जैनपुर) द्वितीय क्रमांक सौ सत्यभामा पिंजरकर (उंबरी) व तृतीय क्रमांक सौ अर्चना बुध( शिंगणवाडी)यांनी तर रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सीमा अशोक ग्रुरडे (दारापूर) द्वितीय क्रमांक शुभांगी चंद्रकांत कोकाटे (नायगाव) तर तिसरा क्रमांक प्रांजली प्रवीण वाटणे (महिमापुर) यांनी प्राप्त केला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुष्ठरोग तंत्रज्ञ विलास देशमुख,लेखापाल श्री प्रफुल देशमुख,सुपरवायझर शिल्पा नवघरे,तालुका समूह संघटक तालुका अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाची सांगता झाली.या स्पर्धा यशस्वी करण्याकरता तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख तालुका तालुका समूह संघटक,आशा गटप्रवर्तक यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Dish Decoration Competition on the occasion of "Asha 'Day in Daryapur