शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"सरकारच्या फसव्या योजनांची चर्चा बांधावर, टपरीवर करा आणि त्यांची पोलखोल करा"

By गणेश वासनिक | Updated: July 10, 2023 17:36 IST

उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन : अमरावती, अकोला संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात केंद्र, राज्य सरकारवर टीका

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ने काय साध्य झाले? आता त्यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या योजना कशा बोगस, फसव्या आहेत, याची चर्चा टपरी, पानठेला, सलून, एसटी, पारावर, बांधावर जेथे-तेथे आणि त्यांची पोलखोल करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे शिवसैनिकांना केले.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अमरावती, अकोला संयुक्त शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर खा. अरविंद सावंत, खा. विनायक राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, शिवसेना शिक्षक आघाडीप्रमुख ज.मो. अभ्यंकर, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, सुधीर सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रीती बंड, पराग गुडधे, नाना नागमोते आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी विदर्भाच्या दौऱ्यावर येताच विरोधकांच्या पोटात गोळा उठला. मतांची भीक मागायला आल्याची टीका ते करतात. आता माझ्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही अन् बापही चोरला. मतांसाठी कुठे फिरणार? कट्टर शिवसैनिकांच्या भेटीसाठी मी आलो आहे. दौऱ्यावर असताना जागोजागी होत असलेले स्वागत बघून मी तुम्हाला देव मानू नाही तर काय, असा उल्लेख त्यांनी शिवसैनिकांचा केला.

नरेंद्र मोदी जगात क्रमांक एकचे नेतृत्व आहे, तर दुसऱ्याचा पक्ष फोडण्याची गरज का पडते? अगोदर शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडली; ही वेळ का आली? भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे, पण आत्मविश्वास राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी केली.

मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप करताच अजित पवारांसह नऊ आमदार भाजपच्यासोबत गेले नि मंत्री झाले. भ्रष्टाचार करा अन् भाजपात या, अशी नवी रणनीती सुरू झाली आहे. भाजपचे केंद्र व राज्याचे नेते सकाळी उठले की, माझा जप करतात. परंतु, माझ्यासोबत शिवसैनिक असल्याने भाजप माझे काहीही वाकडे करू शकत नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी खा. अरविंद सावंत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना