उपअभियंता कार्यालयात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:56 IST2019-03-16T22:53:59+5:302019-03-16T22:56:00+5:30
महावितरणचे स्थानिक उपअभियंता कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत आकारास आली असताना दुसरीकडे या कार्यालयात मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विद्युत देयके भरण्यासाठी एकखिडकीवरील एक कर्मचारी वगळता येथे अन्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.

उपअभियंता कार्यालयात अस्वच्छता
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : महावितरणचे स्थानिक उपअभियंता कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत आकारास आली असताना दुसरीकडे या कार्यालयात मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विद्युत देयके भरण्यासाठी एकखिडकीवरील एक कर्मचारी वगळता येथे अन्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.
इमारतीमध्ये ग्राहक तथा दिव्यांग बांधवांसाठी बैठक व्यवस्थाही नाही. इमारतीच्या आतील भागातील अस्वच्छता संताप आणणारी आहे. कार्यालयाच्या विविध भागात जुन्या, कालबाह्य वस्तूंचा साठा करून ठेवल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. येथे पिण्याच्या पाण्यासह बसण्याची व्यवस्था नसून, स्वच्छतागृहही नाही. याकडे सहायक उपअभियंत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष चालविल्याचा आरोप होत आहे.
कचऱ्यात दारुच्या बॉटल
महावितरणच्या या तालुकास्तरावरील कार्यालयाच्या आवारातील कचऱ्यामध्ये बीअर व दारूच्या खाली शिशांचा खच आढळून येतो. काही असामाजिक तत्त्व रात्रीच्या वेळी या इमारतीचा वापर दारू पिण्यासाठी करतात. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
कार्यालयाच्या आतील परिसरात दारूच्या बॉटल असतील, तर चौकशी करण्यात येईल. ज्या कुण्या व्यक्त ीने ते कृत्य केले असेल, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कार्यालयाची स्वच्छता राखली जाईल.
- चेतन मोहोकार, उपकार्यकारी अभियंता, दर्यापूर