शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

भातकुली तहसील कार्यालय स्थानांतरणावरून वाढले मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST

भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली.

ठळक मुद्देसमर्थक विरोधक समोरासमोर । प्रशासनाकडून आदेशानुसार कार्यवाहीची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भातकुली तहसील कार्यालय भातकुली येथे स्थानांतरण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २७ नोव्हेंबर रोजी काढले. त्यानुसार स्थलांरणाची प्रक्रिया सुरू झाली. तहसील कार्यालयातील शासकीय दस्तावेज स्थलांतरणात खासगी व्यक्तींच्या हस्तक्षेपावरून शनिवारी तहसील स्थलांतरण समर्थक व विरोधक आमसे सामने आले होते. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार टळला.भातकुली तहसील कार्यालयाचे स्थानांतरण अमरावतीतून भातकुलीत करावे यासाठी आमदार रवि राणा यांनी अनेक वर्षांपासून तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबरला नोटीफिकेशन आदेशावर स्वाक्षरी केली व प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना आदेश देऊन तहसील कार्यालय भातकुलीत स्थानांतरणाचे आदेश दिले. स्थानांतरणाची प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सुरू केली. दरम्यान शासकीय दस्तऐवज काही राजकीय पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाहनात भरण्याचे काम केल्याची बाब अयोग्य ठरवून शासकीय दस्तऐवजांतील एखादे दस्तावेज गहाळ झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न झेडपीचे बांधकाम सभापती जयंत देशमुख व भातकुली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकंदर खॉ पठाण, सुनील जुनघरे, सोपान गुडधे, अमरदीप तेलखडे, मंगेश वाहने, उमेश महिंगे, अजय देशमुख, मनोहर अग्रवाल, कैलास अवघड, अनिल बिरे, रोहित देशमुख, नीलेश सरवे जियाउद्दीन, वहीद, राजेश महल्ले यांनी तहसीलदारांना केला. त्यामुळे शासकीय साहित्य स्थलांतरण प्रक्रियेत अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणाचाही सहभाग नसावा, अशी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. श्रीकांत राठी, ब्रदीनाथ थोपसे, गणेश बांबल, विकास देशमुख, संजय चुनकीकर, जयकुमार रघुवंशी, बांबल गुरूजी, विजय पाचपोर, डॉ.पवार, सचिन सरोदे, गोपाल सोळंके, योगेश भट्टड, योगेश उमक, विशाल भट्टड, प्रमोद भोपसे आदींनी केली.अमरावतीत भातकुलीचे तहसील कार्यालय हे तालुक्यातील अनेक गावांच्या सोईचे आहे. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी ठरावही घेतला. जनभावनेचा आदर करून तहसील कार्यालय येथे असणे गरजेचे आहे.- जयंत देशमुख,सभापती, बांधकाम जिल्हा परिषदशासनाच्या अधिसूचनेनुसार तहसील कार्यालय स्थालांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने त्यांचे काम करावे. इतरांनी यात दबाब न आणता तहसीलचे काम भातकुली येथे सुरू करावे, अशी आमची मागणी आहे.- श्रीकांत राठी,नागरिक

टॅग्स :Tahasildarतहसीलदार