शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पाणीटंचाई ग्रस्त गावाना स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश, जिल्हाधिकाऱ्यांनी मागविला वस्तुनिष्ठ अहवाल

By जितेंद्र दखने | Published: May 07, 2024 9:41 PM

टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.

अमरावती : सध्या एकीकडे कडक उन्हाळा तापत आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्याही दिवसेदिवस वाढत आहेत. त्यामुळे टॅकरने पाणी पुरवठा सुरू असलेल्या गावात महसुलसह पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आढाव्या बैठकीत शुक्रवारी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत.सध्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाणी टंचाईची समस्या चांगलीच पेटली आहे. परिणामी जिल्हाभरातील अनेक गावात  खासगी विविर अधिग्रहण व ८ गावात ११ टॅकरने नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी पाणी टंचाईची आढावा बैठक घेतली.या बैठकीत टॅकरने पाणी पुरवठा केलेल्या गावांचा माहिती जाणून घेतली  असता या ठिकाणी चांदुर रेल्वे तालुक्यात एक़ आणि  मेळघाटातील ७ आदिवासी बहूल गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली.  दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी कटियार यांनी टॅकरने पाणी पुरवठा केल्या जात असलेल्या गावांना संबंधित उपविभागीय अधिकारी,तहसिलदार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  यांनी  संबंधित गावांना प्रत्यक्ष भेटी देवून अहवाल सादर करावा,जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  यांनीही सदर गावाला भेटी देवून तेथील परिस्थितीचा आढावा घेवून गावातील  लोकांना पिण्याच्या पाण्याचा टॅकरने योग्यरित्या पाणी पुरवठा होतो किंवा नाही याबाबत माहिती घेवून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. याशिवाय टॅकरग्रस्त गावासाठी सुरू असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व स्वतंत्र पाणी पुरवठा योजना संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करून गावे टॅकरमुक्त होतील व भविष्यात टॅकरने पाणी पुरवठा करण्याची गरज पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनतेच्या तक्रारीची गांर्भियाने दखल घ्यापाणी टंचाई हा अत्यंत महत्वाचा विषय असून सर्व संबंधित अधिकारी  यांनी पाणी टंचाई संदर्भात नागरिकांकडून प्राप्त तक्रारीची गांर्भियाने दखल घेवून व भविष्यात ज्या गावामध्ये पाणी टंचाई सदुष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या गानांना तातडीने भेटी देवून तेथील पाणीटंचाई बाबत परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठाग्रामीण भागात सध्या उन्हाळयाचे दिवसामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे.आजघडीला चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यात बेला,मोथा, खडीमल,धरमडोह, आकी,बहादरपूर व गौलखेडा बाजार आदी गावांना टॅकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जाधव यांनी दिली. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात