राजुरा बाजार येथे डायरियाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:29+5:302021-07-08T04:10:29+5:30
कोरोनाचा कहर काहीशा कमी प्रमाणात होत असतानाच डायरियाने पावसाळ्याच्या तोंडावर डोके वर काढले आहे. अचानक पाच रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी ...

राजुरा बाजार येथे डायरियाचे रुग्ण
कोरोनाचा कहर काहीशा कमी प्रमाणात होत असतानाच डायरियाने पावसाळ्याच्या तोंडावर डोके वर काढले आहे. अचानक पाच रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी एक रुग्ण भरती आहे. चार रुग्ण घरीच उपचार सुरू झाला आहे. पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिक ओरड करीत आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा हा हातुर्णा येथील वर्धा नदीच्या काठावरील विहिरीतून होतो व येथून ११ गावांना पाणीपुरवठा होतो. ११ गाव प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमध्ये लिकेज असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
काल चार व आज एक डायरिया रुग्णाची नोंद झाली आहे. राजुरा येथील नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून घ्यावे, ब्लिचिंग टाकून वापरावे रुग्णांना उलटी, मळमळ वाटत असल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे.
- डॉ. शुभा शेळके,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुरा बाजार
पाणी पुरवठ्याच्या तीनही टाकी स्वच्छ करून ब्लिचिंग चा नियमित वापर करीत असून गावातील सर्व लिकेज जोडलेले आहे. तरीही गावातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी
- मनोज राऊत,
ग्रामविकास अधिकारी, राजुरा बाजार