शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

‘ढेरपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:01 IST

पोलीस दलात फिटनेस हा कायम असावा लागतो. गुन्हेगारांचा पाठलाग, दंगल काबू आणणे, आपत्कालीन प्रसंगी होणारी धावाधाव यासाठी हा फिटनेस पाहिजे; मात्र अनेक पोलीस कर्मचारी याबाबीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांचा स्थूलपणा वाढत जाऊन ते ढेरपोटे होतात. या ढेरपोटे पोलिसांकडून पोलीस दलाला साजेसे काम होत नाही. नाइलाजाने अधिकाऱ्यांना यांना बैठे काम द्यावे लागते. त्यामुळे वेळोवेळी त्यांची रक्तदाब, मधुमेह आदी तपासणी करण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोट सुटणे ही पोलिसांपुढे मोठी समस्या आहे. ढेरपोटे झाल्यानंतर या पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोलिसांची ही समस्या सोडवण्यासाठी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच मनावर घेतले आहे.पोलिसांना यापूर्वी खासगी रुग्णालयातही फीट प्रमाणपत्र घेता यायचे. आता ते केवळ शासकीय रुग्णालयांतून घ्यावे लागते. त्यामुळे अनेकांची त्यासाठी धावाधाव सुरू असते. पोलीस दलात फिटनेस हा कायम असावा लागतो. गुन्हेगारांचा पाठलाग, दंगल काबू आणणे, आपत्कालीन प्रसंगी होणारी धावाधाव यासाठी हा फिटनेस पाहिजे; मात्र अनेक पोलीस कर्मचारी याबाबीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांचा स्थूलपणा वाढत जाऊन ते ढेरपोटे होतात. या ढेरपोटे पोलिसांकडून पोलीस दलाला साजेसे काम होत नाही. नाइलाजाने अधिकाऱ्यांना यांना बैठे काम द्यावे लागते. त्यामुळे वेळोवेळी त्यांची रक्तदाब, मधुमेह आदी तपासणी करण्यात येते. योगासने, मेडिटेशन, वैद्यकीय मार्गदर्शनदेखील तज्ज्ञामार्फत करण्यात करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जेवणालाही वेळ मिळत नाही

‘सणासुदीच्या काळात फिक्स पॉईंट लावले जातात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ बाय ७ तैनात राहावे लागते. त्यामुळे अनेकदा जेवणालाही वेळ मिळत नाही.- एक पोलीस कर्मचारी

‘कोरोनाकाळात महामार्गावर पोलिसी टेंट उभारण्यात आले. मात्र, त्या काळात जेवण तर सोडाच पिण्याच्या पाण्याचीदेखील भ्रांत जाणवली. घरून डबा नेला, तरच पोटात पडायचे.एक पोलीस कर्मचारी

८५४ अर्ज ५५ ते ५८ वर्षवयोगटातील पोलीस कर्मचाऱ्यांना फिटनेस सर्टीफिकेट देणे बंधनकारक आहे. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्ग्णालयाची सेवा घेतली जाते. पोलीस आयुक्तालयात फिटनेस सर्टिफिकेटसंदर्भात ८५४ अर्ज आले आहेत.

कसे राखणार आरोग्य?शहर तथा ग्रामीणमधील गुन्हेगारी वाढतीच आहे. मात्र, त्या तुलनेत पोलीस खात्यात मनुष्यबळाचा अनुशेष वाढताच आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना नानाविध कामे करावी लागतात. अनेक पातळीवर झगडावे लागते. बंदोबस्ताच्या वेळी तर पोटात वेळेवर अन्नही पडत नाही.  पोलीस कर्मचारी आरोग्य राखणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण होतो.

पोट सुटलेल्या, विविध आजारांशी झगडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे तपासणी शिबिर घेतले जाते. त्यांचा बॉडीमास्क इंडेक्स तपासला जातो. पूर्वी खासगी रुग्णालयातून आणलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जायचे. मात्र आता ते केवळ शासकीय रुग्णालयातूनच घ्यावे लागते. ग्रामीण पोलीस व शहर आयुक्तालयात हीच पद्धत अवलंबिली जाते. 

टॅग्स :Policeपोलिस