शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा उत्पादकांचा विकास शून्य

By admin | Updated: January 24, 2016 00:15 IST

प्रक्रिया उद्योग नाही : जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांची व्यथा

अचलपूर : जिल्ह्यात वरुडनंतर अचलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा संत्राफळांचे उत्पादन व विक्रीस ग्रहण लागले होते. संत्र्याला गळती लागल्याने कोट्यवधींचा संत्रा मातीमोल झाला. तालुक्यात संत्रा प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्रा उत्पादकांना दरवर्षी फटका बसत आहे. वरुड आणि मोर्शी तालुक्या प्रमाणे अचलपूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात संत्राफळांचे उत्पादन घेतले जाते. ५४११६ पैकी १० हजार ४१९ हेक्टर क्षेत्र संत्रापिकाखाली आहे. तालुक्यातील एकूण १६ हजार ७२० हेक्टरचे सिंचन होते. त्यासाठी ८११३ विहिरी आहेत. यंदा सतत गळतीमुळे संत्रा ५० टक्के राहिला. त्यातच संत्र्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला होता. व्यापारी बागेतील मोठ्या चांगल्या फळांची मोजणी करायचे. त्यामुळे बारीक संत्रा त्याच ठिकाणी तोडून फेकला जात होता. त्यामुळे संत्रा मंडई परिसरात सडलेल्या संत्र्याचे ढिग असायचे यावेळी संत्रा उत्पादकांना फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. अचलपूर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६४६३० हेक्टर आहे. त्यापैकी ५४११६ हेक्टर जमीन वाहितीखाली आहे. यात ३३ टक्के जमिन मध्यम तर ३५ टक्के भारी स्वरुपाची आहे. तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४ हजारांच्या वर असून खातेदार ९८ हजार ९१३ आहेत. सिंचनाची मुबलक सोयी असूून पाणी साठाही भरपूर आहे. त्यामुळे पपई, सीताफळ, डाळिंब, पेरू, आवळा, भाजीपाला आदी फळ व पालेभाज्यांची पिके घेतली जातात. तर २,०४३ हेक्टरवर ज्यावारी सोयाबीन १७,११० हेक्टरवर कपाशी, ६१२६ हेक्टरवर तूर घेण्यात आली. तालुक्यात संत्रा पिकांचे महत्तम पीक येऊन भाव व मागणी नसल्याने उत्पादकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला असून संत्रा प्रक्रिया उद्योग किंवा संत्राफळ साठवण्यासाठी शितगृह आणण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी) संत्र्यावर रोगांचे आक्रमण यंदा संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या खचला. संत्र्यावर हवामानातील बदलामुळे कोळशी, बुरशी, सायटरसीला यामुळे फळांवर कंठावायबार या रोगामुळे फळांवर परिणाम झाला. संत्र्याला नको तेवढी गळती लागली. त्याचप्रमाणे शासनाच्या तुघलकी कारभारामुळे संत्रा निर्यातीवर विपरीत परिणाम झाला, अशी प्रतिक्रिया नारायणराव मेटकर, शंकरराव भिडकर, सुदेश भाकरे, मणिराम दहीकर, राजाभाऊ शिंदे, श्रीधर क्षीरसागर यांनी दिली आहे. संत्रा हे नाशवंत फळ आहे. अचलपूर तालुक्यातून दिल्ली, मुंबई, हरियाणा, पंजाबपर्यंत संत्रा पाठविला जातो. वाहतूक करताना संत्रा सडतो. यंदा संत्र्याचे उत्पादन होऊनही गळती लागल्याने त्याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आता तर विदेशातही संत्र्याला मागणी होऊ लागली आहे. वाहतूक खर्च लक्षात घेता शेतकरी व व्यापारी दोघांच्याही हिताचे नाही. -अजय लकडे, संत्रा उत्पादक मंडई. यंदा संत्र्याला गळती मोठ्या प्रमाणात होती. नैसर्गिक आपत्तीही होती. यामुळे संत्रा पिकावर परिणाम झाला. तालुक्यातील शेतात आमच्या पथकाने जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तज्ज्ञ बोलावून त्यावर उपचार केले. बहुतांश गावांत मार्गदर्शन शिबिरेही घेतली. - एस.बी. जाधव, तालुका कृषी अधिकारी.