शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला

By admin | Updated: August 4, 2014 23:30 IST

अनुसूचित जमातीत इतर समाजाला समाविष्ट करुन आरक्षण देण्याचे शासनाचे असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजाने सोमवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडविला.

पोलिसांची उडाली तारांबळ : आदिवासी फासेपारधी समाजाचा आरक्षणाला विरोधअमरावती : अनुसूचित जमातीत इतर समाजाला समाविष्ट करुन आरक्षण देण्याचे शासनाचे असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजाने सोमवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडविला. फासेपारधी समाजाने केलेल्या या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली. पारधी बांधव अचानक रस्त्यावर उतरल्याने ‘कॅन्व्हाय’ थांबला. यावेळी एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री स्वत: वाहनाखाली उतरले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मतीन भोसले यांच्याशी संवाद साधून फासेपारधी समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. आदिवासी समाजावर आरक्षणासंदर्भात अन्याय होणार नाही, अशी खात्री अजित पवारांनी दिल्यानंतरच फासे पारधी बांधवांनी रस्ता मोकळा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आ. रवी राणा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे आदींनी आंदोलनकर्त्या आदिवासी फासेपारधी समाजाची समजूत काढली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दुसऱ्या मार्गाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहे. राज्यघटना बदलविण्याचे षडयंत्र मुळीच नाही. घटनेचा अपमान होणार नाही, याची दखल घेतली जाईल, असे मतीन भोसले यांना त्यांनी सांगितले. तब्बल अर्धा तास उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा रस्त्यावर थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी तितर, बटेर, रोही आदी वन्यप्राणी पकडण्याचे साहित्य सोबत आणले होते, हे विशेष. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आदिवासी फासेपारधी समाजाने मागण्याचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)