उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला

By Admin | Updated: August 4, 2014 23:30 IST2014-08-04T23:30:34+5:302014-08-04T23:30:34+5:30

अनुसूचित जमातीत इतर समाजाला समाविष्ट करुन आरक्षण देण्याचे शासनाचे असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजाने सोमवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडविला.

The Deputy Chief Minister stopped the croaking | उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला

उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविला

पोलिसांची उडाली तारांबळ : आदिवासी फासेपारधी समाजाचा आरक्षणाला विरोध
अमरावती : अनुसूचित जमातीत इतर समाजाला समाविष्ट करुन आरक्षण देण्याचे शासनाचे असलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आदिवासी फासेपारधी समाजाने सोमवारी उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडविला. फासेपारधी समाजाने केलेल्या या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली. पारधी बांधव अचानक रस्त्यावर उतरल्याने ‘कॅन्व्हाय’ थांबला. यावेळी एकच गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री स्वत: वाहनाखाली उतरले. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मतीन भोसले यांच्याशी संवाद साधून फासेपारधी समाजाचे म्हणणे ऐकून घेतले. आदिवासी समाजावर आरक्षणासंदर्भात अन्याय होणार नाही, अशी खात्री अजित पवारांनी दिल्यानंतरच फासे पारधी बांधवांनी रस्ता मोकळा केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आ. रवी राणा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे आदींनी आंदोलनकर्त्या आदिवासी फासेपारधी समाजाची समजूत काढली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता दुसऱ्या मार्गाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहे. राज्यघटना बदलविण्याचे षडयंत्र मुळीच नाही. घटनेचा अपमान होणार नाही, याची दखल घेतली जाईल, असे मतीन भोसले यांना त्यांनी सांगितले.
तब्बल अर्धा तास उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाचा ताफा रस्त्यावर थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी तितर, बटेर, रोही आदी वन्यप्राणी पकडण्याचे साहित्य सोबत आणले होते, हे विशेष. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर आदिवासी फासेपारधी समाजाने मागण्याचे निवेदन सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Deputy Chief Minister stopped the croaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.