भीमटेकडीवर राजकीय कार्यक्रमास नकार
By Admin | Updated: April 30, 2016 00:17 IST2016-04-30T00:17:56+5:302016-04-30T00:17:56+5:30
बेनोडा (जहांगीर) येथील समस्त नागरिक निर्मित क्रांतीसूर्य युवक समितीतर्फे बेनोडा भीमटेकडीवर....

भीमटेकडीवर राजकीय कार्यक्रमास नकार
निवेदन: कायदा सुव्यवस्था अबाधित राखा
अमरावती: बेनोडा (जहांगीर) येथील समस्त नागरिक निर्मित क्रांतीसूर्य युवक समितीतर्फे बेनोडा भीमटेकडीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरणाविषयी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी आता शासनाचे निर्देश येईपर्यंत कोणताही राजकीय कार्यक्रम घेण्यात येऊ नये, कारण १३ तारखेला झालेल्या प्रकाराबाबत अनेक समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तेथे कुठलाही कार्यक्रम झाल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, असे समितीचे अध्यक्ष प्रवीण बनसोड व समितीचे उपाध्यक्ष विक्की वानखडे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगीतले. जिल्हाधिकारी यांनी समजून घेवून असे कुठल्याही प्रकारचे अनुचित घडणार नाही, असे आश्वासन सुध्दा दिले.
चर्चा झाल्यावर समितीतर्फे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतेवेळी क्रांतीसूर्य युवक समितीचे अध्यक्ष प्रवीण बन्सोड, उपाध्यक्ष विक्की वानखडे, विदर्भ लहुजी सेना शहर अध्यक्ष अमोल जोंधळे, जगन वानखडे, अतूल खांडेकर, रामा राऊत, अनिल कदम, आकाश कडू, बबलू ससाने, बबलू वासनिक, सुनील मुंदे, गौरव खोंड, भूषण आदी पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी पुतळ्याच्या अनावरणावरून राजकीय वाद सुरु झाला होता. (प्रतिनिधी)