डेंग्यूने सात मृत्यू, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:41 IST2018-10-13T22:41:01+5:302018-10-13T22:41:24+5:30
शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली.

डेंग्यूने सात मृत्यू, संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा
अमरावती : शहरासह जिल्ह्यात डेंग्यूने सात नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. यासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून या प्रकरणाची गृह विभागाकडून चौकशी व कारवाई करावी, तसेच मृतांच्या कुटुंबाला भेट देऊन शासनाच्यावतीने आर्थिक मदत देण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली.
जिल्ह्यात दोन महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आतापर्यंत सात जणांचा बळी गेला. अद्यापही सहाशेचेवर रुग्ण डेंग्यू आजारावर उपचार घेत असल्याची नोंद आहे. याप्रकरणी राज्याच्या गृहविभागाच्यावतीने स्वतंत्र चौकशी करावी. सबंधित अधिकाºयावर कारवाई करावी. या मृतांच्या घरी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन शासनाच्यावतीने त्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच याला कारणीभूत असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करणार असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात अपुºया पावसामुळे खरीप पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यासाठी एकरी ३० हजारांचा मदतनिधी तत्काळ उपलब्ध करावा, यासह अन्य मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर त्या मांडणार आहेत.