शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ९३ मुख्याध्यापकांचे ‘डिमोशन’

By admin | Updated: December 19, 2015 00:11 IST

जिल्ह्यातील ६०८ शिक्षकांसह ९३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. यामुळे समायोजनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे.

मराठीसह उर्दू शाळांचा समावेश : सहायक किंवा पदवीधर शिक्षक म्हणून देणार सेवा अमरावती : जिल्ह्यातील ६०८ शिक्षकांसह ९३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. यामुळे समायोजनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. शिक्षकांवर समायोजनाची टांगती तलवार असताना मुख्याध्यापकांना संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. यात मराठी माध्यमाच्या ७६ आणि उर्दू माध्यमाच्या १७ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. या ९३ मुख्याध्यापकांना समायोजनास अपात्र ठरविल्याने ही प्रक्रियाच आता न्यायालयीन कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मराठी आणि उर्दू माध्यमातील प्राथमिक शिक्षण विभागातील ९३ मुख्याध्यापक समायोजनास अपात्र ठरल्याने त्यांना अन्य शाळांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार सहायक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक म्हणून रुजू व्हावे लागणार आहे. आरटीई २००९ नुसार सन २०१५-१६ च्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर व कार्यरत पदांच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ पंचायत समितींमध्ये आरटीई २००९ नुसार मुख्याध्यापकांची २०४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्या तुलनेत २८० मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे मराठी माध्यमातील ७६ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरल्याने ते समायोजनासाठी अपात्र ठरले आहेत तर उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १७ मुख्याध्यापक समायोजनासाठी अपात्र अर्थात पदावनत ठरले आहेत. मुख्याध्यापक म्हणून कार्यरत या ९३ जणांना आता सहायक शिक्षक म्हणून काम करावे लागणार आहे. त्यामुळे या मुख्याध्यापकांमध्ये प्रचंड असंतोष धूमसत आहे. मुख्याध्यापकांसह जिल्ह्यातील ३०८ शाळांमधील सुमारे ६०८ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यभरातील शाळांना लवकरच टाळे लागण्याचे सूतोवाच झाल्याने जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. अद्याप त्यासंदर्भात आदेश आला नसला तरी जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती शासनाने मागितल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीसुध्दा सांगितले आहेत. (प्रतिनिधी)