राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:12 IST2021-03-31T04:12:53+5:302021-03-31T04:12:53+5:30

दर्यापूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी हिंदू धर्माचा पवित्र ...

Demand to file a case against Rana couple | राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

दर्यापूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी हिंदू धर्माचा पवित्र सण समजल्या जाणाऱ्या होळीला चप्पल व बुटांचा हार घालून, चपला मारून त्याचा व्हिडीओ काढला. सोशल मिडियावर अपलोड केला. हरिसाल येथे २८ मार्च रोजी ही घटना घडली. त्यापार्श्वभूमीवर हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

हिंदू धर्मामध्ये होळी सणाला खूप महत्त्व आहे. समाजातील नकारात्मक शक्ती वाईट विचार, वाईट प्रवृत्तीचा नाश होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी हिंदू धर्मीय होळीच दहन करतात. अशा पवित्र होळीला चपलेचा हार घालून पेटविण्यात आले. यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करून त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल अरबट, शिवसेना शहरप्रमुख रवींद्र गणोरकर, अंकुश कावडकर, सचिन कोरडे आदींनी केली. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. याबाबत ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी निवेदन देण्यात आले.

---------------

Web Title: Demand to file a case against Rana couple