आठवडी बाजारातील फटाक्यांची दुकाने हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 21:32 IST2017-10-14T21:32:03+5:302017-10-14T21:32:17+5:30
न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता अधिकाºयांशी तडजोड करून फाटयाक्यांचे दुकाने मुख्य बाजारात लावल्या जात आहे.

आठवडी बाजारातील फटाक्यांची दुकाने हटवा
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता अधिकाºयांशी तडजोड करून फाटयाक्यांचे दुकाने मुख्य बाजारात लावल्या जात आहे. यावर कोणतिही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी बाजारात असलेली दुकाने हटवावी यासंदर्भात एक निवेदन उपविभागीय अधिकायांना दिले.
शहरातील आठवडी बाजारातील शनी मंदिरपरिसरामध्ये २०-२५ फटाक्यांची दुकाने गेल्या कित्येक वर्षापासून लावण्यात येते. दुकाने लावण्यासाठी नगर पालिकेने सुद्धा परवाणगी दिली. या ठिकाणी मोठी वस्ती आहे, यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे फटाके विक्रेत्यांना अन्यत्र दुकाने लावण्याची परवाणगी द्यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी दिलीप झळके, प्रफुल शिंदे, ओम शर्मा, अयुब भाई, संतोष श्रीनाथ, चंदा राठोड, राम शिंदे, साहेबराव धानोरकार, रुपेश वाघमारे, मनीषा झळके, ज्योती श्रीनाथ, ताराबाई ठाकुर, लीता घोसे उपस्थित होते.