Deepali Chavan Suicide Case : श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 15:09 IST2021-05-01T15:09:24+5:302021-05-01T15:09:55+5:30
Deepali Chavan Suicide Case: १ मे रोजी पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा धारणी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Deepali Chavan Suicide Case : श्रीनिवास रेड्डीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेल्या श्रीनिवास रेड्डी याला शनिवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद एस गाडे यांच्या न्यायालयाने सुनावली. दोन दिवसाची पोलीस कोठडी संपल्याने दुपारी एक वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीचे आदेश होताच १:३० वाजता धारणी पोलीस स्टेशनला आणून रीतसर बयान व नोंद घेण्यात आली. त्यानंतर पोलीस वाहनांमध्ये बंदोबस्तात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. (Deepali Chavan Suicide Case: srinivasa reddy remanded in judicial custody for 14 days)
बुधवारी सायंकाळी नागपूर येथून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला वन विभागाच्या शासकीय निवासातून चौकशीसाठी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने आणले होते आणि धारणी येथे आणून २९ एप्रिल गुरुवारी एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून अहवालात मध्ये टाकण्यात आले. दुपारी १ वाजता न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
१ मे रोजी पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा धारणी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दरम्यान धारणी पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली नसल्याचे सरकारी अभियोक्ता भारत भगत यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
स्वतःच्या बॅगा घेऊन चढला रेड्डी पोलीस वाहनात
व्याघ्र प्रकल्पातील वरिष्ठ पदावर कार्यरत एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी उच्चपदस्थ आयएफएस अधिकारी असल्याने पाच जिल्ह्यासह मंत्रालयापर्यंत त्यांचा चांगलाच तोरा होता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा त्याच्या मागे पुढे चालत होता पोलीस कोठडीतून न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर पोलिसांनी परत त्याला धारणी पोलीस ठाण्यात आणले व त्याने त्याच्या एक पिशवी व एक काळया रंगाची बॅग स्वतःच उचलून पोलिसांच्या वाहनात त्याला बसावे लागले.
पोलीस अधीक्षकांनी केली चौकशी
जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी पोलिस कोठडीत असलेल्या निलंबित आरोपी एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीची शुक्रवारी सायंकाळी धारणी येथे जाऊन घटनेसंदर्भात चौकशी केली त्यादरम्यानच तपास अधिकारी तथा एसडीपीओ पुनम पाटील ठाणेदार विलास कुलकर्णी सपोनि प्रशांत गीते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते मात्र पोलिस अधीक्षकांनी बंद खोलीत तपास अधिकारी पुनम पाटील यांच्या उपस्थितीत चौकशी केली चौकशीत नेमके कुठले प्रश्न आरोपी श्रीनिवास रेड्डीला केले हे मात्र कळू शकले नाही.