धामणगावात स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:59+5:302021-09-19T04:13:59+5:30
नगरपालिकेचे उपाध्यक्ष देवकरण रॉय, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भंडारी, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, शहराध्यक्ष गिरीश भुतडा, भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या रत्नमाला ...

धामणगावात स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे लोकार्पण
नगरपालिकेचे उपाध्यक्ष देवकरण रॉय, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भंडारी, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिरपूरकर, शहराध्यक्ष गिरीश भुतडा, भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या रत्नमाला पोळ, भाजप महिला शहराध्यक्ष नलिनी मेश्राम, पंचायत समिती सदस्य राजकुमार केला, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राठी, अमोल टेंभरे, प्रशांत बदनोरे, मोनू भंसाली, डॉ. स्नेहा पावडे , भाजपा सचिव अशोक शर्मा प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिकाची निर्मिती धामणगाव नगरीमध्ये व्हावी, हे तत्कालीन नगराध्यक्ष प्रताप अडसड, सर्व नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाचे स्वप्न साकारल्याचे अरुण अडसड म्हणाले. नगरपालिकेतर्फे किशोर बागवान यांनी अभ्यासिका बांधकाम बाबत माहिती दिली. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत, बांधकाम सभापती सुनील जावरकर, नगरसेवक विनोद धुर्वे, डॉ. हेमकरण कांकरिया, शुभम किनाके, संतोष पोळ, पद्माकर पाटील, अर्चना ठाकरे, अर्चना गोडबोले, दर्शना ठाकूर, सीमा देवतळे, कल्पना देशमुख, पुष्पा मुलवंडे, गुलाम रसूल, सारिका बोरगावकर उपस्थित होत्या. प्रास्ताविक भाजपा शहराध्यक्ष गिरीश भुतडा, संचालन अशोक शर्मा व आभार प्रदर्शन नलिनी मेश्राम यांनी केले.